शिवज्योत आणण्यासाठी रायगडावर निघालेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात; 200 फूट दरीत कोसळली बाईक

मुंबई तक

भोर येथून रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिव भक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला.  मोटरसायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळली. या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 सर्व राहणार भोंगवली तालुका भोर अशी जखमींची नावं […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

भोर येथून रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिव भक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला.  मोटरसायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळली. या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 सर्व राहणार भोंगवली तालुका भोर अशी जखमींची नावं आहेत. 

त्या पैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असुन एकाला प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले.

भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगड किल्ल्याच्या दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फूट दरीत कोसळली. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. वरंध घाटात अपघात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. अपघातामध्ये तिघेजण एकाच मोटारसायकलवर होते. गाडीवरचा संयम सुटल्याने हा प्रकार घडला आहे. तिघांनाही महाडच्या ग्रामीण रूगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण अशा घटना घडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या ठिकाणी दु:ख व्यक्त कऱण्यात येत आहे. कालपासून महाराष्ट्रात अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सूर्यवंशी 20 हे तरूण गाडीवरून पडल्यामुळे जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp