अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या केल्यावर आरोपींनी बिर्याणी पार्टी केली, NIA ची कोर्टाला माहिती

विद्या

अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले अब्दुल अरबाझ आणि मौलवी मुश्फाक अहमद या दोघांचीही रवानगी कोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत NIA कोठडीत केली आहे. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना किमान १५ दिवस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना १२ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अमरावतीच्या उमेश कोल्हेंची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले अब्दुल अरबाझ आणि मौलवी मुश्फाक अहमद या दोघांचीही रवानगी कोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत NIA कोठडीत केली आहे. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना किमान १५ दिवस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना १२ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मा यांच्याविषयीच्या पोस्टमुळेच,पोलिसांची माहिती

NIA ने नेमकं काय म्हटलं आहे कोर्टात?

NIA ने हा देखील आरोप केला आहे की यातला एक आरोपी अरबाझने उमेश कोल्हे यांच्यावर आणि त्यांच्या घरावर तसंच त्यांच्या मेडिकलवर लक्ष ठेवलं होतं. इतर आऱोपींना पळून जाण्यास आणि लपण्यास त्याने मदत केली होती असंही NIA ने कोर्टात सांगितलं. एनआयएने सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांनी सात आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना या आरोपींनी नेमकं काय केलं आहे याचा शोध लागला.

उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची बिर्याणी पार्टी

न्यायालयाच्या चेंबरमध्ये प्रसारमाध्यमांना परवानगी नव्हती परंतु दोन आरोपींसाठी उपस्थित असलेले वकील अली काशिफ खान यांनी सांगितलं, एनआयएने न्यायालयात सांगितलं की उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी बिर्याणी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत कोण कोण होतं याचा तपास करणं आवश्यक आहे असंही स्पष्ट करण्यात आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp