मुंबई : अंगडीयाच्या ऑफीसमध्ये दरोडा, बंदुकीच्या धाकावर ८० लाखांची रक्कम लुटली

मुंबई तक

मुंबईच्या मुलुंड भागात आज एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान एडनवाला इमारतीमध्ये असलेल्या एका अंगडीच्या ऑफीसमध्ये आरोपींनी दरोडा टाकत ७५ ते ८० लाखांची रक्कम लुटली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दुपारी चार वाजता अज्ञात आरोपी एडनवाला इमारतीतील कार्यालयात घुसले आणि त्यांनी बंदुकीच्या धाक दाखवायला सुरुवात केली. यापैकी एका आरोपीने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईच्या मुलुंड भागात आज एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान एडनवाला इमारतीमध्ये असलेल्या एका अंगडीच्या ऑफीसमध्ये आरोपींनी दरोडा टाकत ७५ ते ८० लाखांची रक्कम लुटली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुपारी चार वाजता अज्ञात आरोपी एडनवाला इमारतीतील कार्यालयात घुसले आणि त्यांनी बंदुकीच्या धाक दाखवायला सुरुवात केली. यापैकी एका आरोपीने पैसे आपल्या बॅगेत भरायला सुरुवात केली आणि इतर आरोपींनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखत कोणीही आवाज करणार नाही याची काळजी घेतली.

हे आरोपी एका कारमधून आल्याची माहिती कळते आहे, दरोडा टाकल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अद्याप या दरोड्याबद्दल कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाहीये. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीत या घटनेचा तपास सुरु आहे.

Mumbai Crime : ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण, तीन आरोपींना अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp