अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण : AJ च्या अटकेचा थरार; पोलिसांनी केली कामगिरी फत्ते!
Amruta Fadnavis Blackmailng Case: मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करून धमकावल्याचा आरोप असलेला बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी गुजरातमधून (Gujarat) त्याला अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि […]
ADVERTISEMENT

Amruta Fadnavis Blackmailng Case:
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करून धमकावल्याचा आरोप असलेला बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी गुजरातमधून (Gujarat) त्याला अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अनिक्षाला यापूर्वीच अटक केली असून आता अनिल जयसिंघानीच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. (Accused of blackmailing Amrita Fadnavis bookie Anil Jaisinghani finally arrested under Operation AJ)
Operation AJ :
दरम्यान, अनिल जयसिंघानी याच्या अटकेसाठी पोलिसांनी ऑपरेशन AJ आखलं होतं. याबाबत डीसीपी बलसिंग राजपूत यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, अनिल जयसिंघानिया हा देशातील अव्वल बुकी आहे, त्याचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहेत. त्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत, तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. त्याला अटक करण्यासाठी ऑपरेशन AJ आखलं होतं.
यात एकूण 5 टीम तयार करण्यात आल्या होत्या, मात्र इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपी सतत पोलिसांना चकवा देत होता. अशात पहिलं लोकेशन शिर्डीमध्ये ट्रेस झालं. यावरुन महाराष्ट्रातील 2 टीम शिर्डीत पोहचल्या. मात्र आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तिथून तो गुजरातला पळून गेला. त्यानंतर आणखी 3 टीम गुजरातमध्ये गेल्या. तिथे बार बोली गावात लोकेशनच्या आधारे शोध घेतला, परंतु तो तिथूनही पळून सुरतला गेला.