Pathaan : “ते काम दुसरं कोणी करु शकत नाही”; रेणुका शहाणे-SRK चा मजेशीर संवाद
Bollywood Super star Shahrukh Khan : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट (Pathaan Movie) अनेक विक्रम मोडत आहे. येत्या काही दिवसांत हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा चित्रपट बनू शकतो, असं म्हणतं अनेक जाणकार या चित्रपटाचं भरभरुन कौतुक करत आहेत. बॉक्स ऑफिसवर पठाणची मोहिनी अजूनही कायम आहे. या मोहिनीपासून अभिनेत्री रेणुका शहाणेही (Renuka Shahane) स्वतःला लांब […]
ADVERTISEMENT

Bollywood Super star Shahrukh Khan :
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट (Pathaan Movie) अनेक विक्रम मोडत आहे. येत्या काही दिवसांत हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा चित्रपट बनू शकतो, असं म्हणतं अनेक जाणकार या चित्रपटाचं भरभरुन कौतुक करत आहेत. बॉक्स ऑफिसवर पठाणची मोहिनी अजूनही कायम आहे. या मोहिनीपासून अभिनेत्री रेणुका शहाणेही (Renuka Shahane) स्वतःला लांब ठेवू शकली नाही. ती देखील आज सपत्नीक हा चित्रपट पाहण्यासाठी पोहचली. यावेळी ट्विटवरवरुन तिच्यात आणि शाहरुखच्या मजेशीर संवाद पाहायला मिळाला. (Renuka Shahane-SRK funny interaction on pathaan movie)
काय झालं नेमकं?
अभिनेत्री रेणुका शहाणे आज पती अशुतोष राणा यांच्यासमवेत पठाण चित्रपट पाहण्यासाठी गेली. यावेळी तिने ट्विटरवर एक पोस्टही शेअर केली. “Finally going to watch #Pathaan. Mausam bilkul sahi hai, kursi ki peti baandh li hai, with Col Luthra ji. अशी पोस्ट तिने ट्विट केली. यावर शाहरुख खानने मजेशीर रिप्लाय केला.
Col Luthraji ko bataya aapne ki aap meri pehli heroine hain!! Or should we keep it a Top Secret otherwise he may fire me from the agency!!! https://t.co/GsCj5h0vC2
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 5, 2023