हात-पाय एका बाजूला, उरलेलं शरीर एका बाजूला; प्रसिद्ध लोकगायिकेची निर्घृण हत्या, नदीकाठी काय घडलं?

मुंबई तक

एका ओसाड जंगलात नदीकाठी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. जेव्हा मृतदेहाची ओळख पटली, तेव्हा प्रत्येकजण थक्क झाला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

हात-पाय एका बाजूला, उरलेलं शरीर एका बाजूला

point

प्रसिद्ध लोकगायिकेची निर्घृण हत्या

point

नदीकाठी काय घडलं?

Crime News : एका ओसाड जंगलात नदीकाठी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. जेव्हा मृतदेहाची ओळख पटली, तेव्हा प्रत्येकजण थक्क झाला. हा मृतदेह बुंदेली लोकगीत गायिका लाडकुंवर उर्फ लवली मौर्या हिचा असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या दारूच्या बाटल्या, बिअर कॅन, जळालेला मोबाईल आणि एक संशयास्पद कार यामुळे हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील एका गावातील ही घटना आहे.

हात पाय एका बाजूला, उरलेले शरीर एका बाजूला

जेव्हा शेतकरी शेताकडे गेले, तेव्हा त्यांना धुर येताना दिसला. जवळ जाऊन पाहिले असता तिथे एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पडला होता. मृतदेहाची अवस्था इतकी भयानक होती की हात-पाय वेगळे होऊन जळाले होते आणि शरीराच्या बऱ्याचशा भागाची राख झाली होती. घटनेची माहिती मिळताच गावात एकच गोंधळ उडाला. सरपंच डॉ. जगदीश कुशवाहा यांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि अनेक पोलीस ठाण्यांची कुमक घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळ पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी पहिल्याच दृष्टिक्षेपात हत्या करून मृतदेह जाळल्याची शक्यता वर्तवली.

घटनास्थळावरून पोलिसांना अनेक संशयास्पद वस्तू मिळाल्या. जवळच असलेल्या शेतात दारूच्या रिकाम्या बाटल्या, बिअर कॅन, चिप्सची पाकिटे आणि एक जळालेला मोबाईल सापडला. शेताच्या कुंपणात लाल रंगाच्या दुपट्ट्याचा फाटलेला तुकडाही अडकलेला दिसला. तसेच महिलेची काळ्या रंगाची चप्पलही जप्त करण्यात आली. पोलिसांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, महिलेला एखाद्या वाहनातून येथे आणले असावे. तिच्यावर हल्ला केल्यानंतर मृतदेहाला आग लावून देण्यात आली, जेणेकरून ओळख आणि पुरावे दोन्ही नष्ट होतील.

हे ही वाचा : कानात स्क्रू ड्रायव्हर, डोळे काढले आणि हात पाय छाटले; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संपवल्याचा आरोप

अशी पटली मृतदेहाची ओळख

सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते, कारण चेहरा आणि शरीर पूर्णपणे जळाले होते. परंतु घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, बेपत्ता महिलेचा शोध घेणारे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. साडीचे तुकडे, पैंजण, अंगठी आणि चपलांच्या आधारे मृतदेहाची ओळख 45 वर्षीय लाडकुंवर उर्फ लवली मौर्या म्हणून पटली.

हे वाचलं का?