दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडल्याने तिला मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने दीपिकाला मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात सोमवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आल्याची माहिती पिंक व्हिलाने दिली आहे. रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दीपिकाच्या काही चाचण्याही करण्यात आल्या.

ADVERTISEMENT

दीपिका चार महिन्यात दुसऱ्यांदा रूग्णालयात

दीपिका पदुकोणच्या प्रकृतीविषयी तिचे चाहते चिंतेत आहेत. कारण काही तीन महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये शुटिंग करत असताना दीपिकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी दीपिकाला खूप अस्वस्थ वाटत होतं होतं. तसंच तिचा हार्ट रेट वाढल्याने तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सततच्या शूटिंगमुळे दीपिकाला थकवा आल्याचं आणि तिचा हार्ट रेट वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आता चार महिन्यात दुसऱ्यांदा दीपिकाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

सोशल मीडियावर दीपिकाच्या आजारी असल्याची चर्चा

सोशल मीडियावर विरल भयानीनं इंस्टावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामध्ये त्यानं काल दीपिकाला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. तिनं वेगवेगळ्या टेस्ट केल्याचे म्हटले आहे. आता तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र दीपिकाच्या वतीनं अधिकृतपणे कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

ADVERTISEMENT

पठाणमध्ये झळकणार दीपिका

पठाण हा दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. २५ जानेवारीला म्हणजेच पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

ADVERTISEMENT

दीपिका पदुकोण ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. शाहरुख खानसोबत तिने ओम शांती ओम हा सिनेमा केला होता. हा दीपिकाचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर तिने रणबीर कपूर, सैफ अली खान, फरहान अख्तर, रणवीर सिंग यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केला आहे. रणवीर सिंग आणि तिची जोडी पडद्यावर लोकांना प्रचंड भावली. या दोघांनी लग्नही केलं आहे. दीपवीर म्हणून दीपिका आणि रणवीरची जोडी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT