अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या!

मुंबई तक

पुणे: सिनेअभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिच्या चुलत भावाने पुण्यात आत्महत्या केली आहे. नोकरी न मिळण्याच्या भीतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत त्याने आपले जीवन संपवले आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत अक्षय हा संगणक अभियंता होता. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे: सिनेअभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिच्या चुलत भावाने पुण्यात आत्महत्या केली आहे. नोकरी न मिळण्याच्या भीतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत त्याने आपले जीवन संपवले आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत अक्षय हा संगणक अभियंता होता. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्जही केले होते. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली असा उल्लेख त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत काम करतात. या घटनेनंतर माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp