संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा 'जयचंद' म्हणून उल्लेख, तिकडं निशिकांत दुबे संतापले, नेमकं काय म्हणाले?
Nishikant Dubey on Sanjay Raut : मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचा पराभव करत महायुतीने विजयाचा ध्वज फडकावला आहे. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका बाजूला भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि अस्मितेसाठी लढत राहणार असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी पराभवासाठी एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलं आहे. एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जयचंदची उपमा दिली. यावरुन भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा 'जयचंद' म्हणून उल्लेख
निशिकांत दुबेंचा संजय राऊतांना टोला
Nishikant Dubey on Sanjay Raut : मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचा पराभव करत महायुतीने विजयाचा ध्वज फडकावला आहे. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका बाजूला भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि अस्मितेसाठी लढत राहणार असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी पराभवासाठी एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलं आहे. एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जयचंदची उपमा दिली. यावरुन भाजपचे खासदार निशिकांत दुबे संतापले आहेत. यामुळे राऊत आणि दुबे असा वाद रंगल्याचं पहायला मिळत आहे.
हे ही वाचा : मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, नगरसेवकांचा पुढील 3 दिवसांचा मुक्काम ठरला!
निशिकांत दुबे म्हणतात, संजय राऊत नारदमुनी
संजय राऊत यांनी मुंबई मनपामधील ठाकरे बंधूंच्या पराभवाला एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलं आहे. एकनाथ शिंदेंना मराठी जनता जयचंदच्या रुपात लक्षात ठेवेल असं राऊत म्हणाले. तसेच जर एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली नसती तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता असंही ते म्हणाले. यावरुन भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद रंगला आहे. एक्सवर पोस्ट करत दुबेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. एक्सवर पोस्ट करत दुबेंनी राऊत हे नारदमुनी आणि मंथराचे एकत्रित रुप असल्याचे म्हटले आहे.










