मुंबई ठाकरेंकडून गेली, कुणाला नक्की काय मिळालं? महापालिका निकालाचे अर्थ

निलेश झालटे

Mharashtra Municipal Elections : भाजपची ताकद आहेच. ती अजून वाढली आकड्यांमध्ये. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली. अजितदादांची बार्गेनिंग पॉवर प्रचंड कमी झाली. ठाकरेंनी दम दाखवला. भाऊ-भाऊ सोबत आल्यामुळं एक क्रेडीबिलिटी निर्माण झाली. काँग्रेसला दिलासा देणारे काही निकाल आले. एमआयएमचा परफॉर्मन्स मनसे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा खूप पटीने चांगला राहिला. वंचित, एमआयएम, बविआ, शेकापचा काही भागांमध्ये जबरदस्त प्रभाव दिसून आला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपची ताकद अजून वाढली

point

स्वीकारलेल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास मनसेचे भविष्य उज्ज्वल

point

दोन राष्ट्रवादी सोबत येण्याचा फायदा नाहीच 

Mharashtra Municipal Elections : भाजपची ताकद आहेच. ती अजून वाढली आकड्यांमध्ये. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली. अजितदादांची बार्गेनिंग पॉवर प्रचंड कमी झाली. ठाकरेंनी दम दाखवला. भाऊ-भाऊ सोबत आल्यामुळं एक क्रेडीबिलिटी निर्माण झाली. काँग्रेसला दिलासा देणारे काही निकाल आले. एमआयएमचा परफॉर्मन्स मनसे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा खूप पटीने चांगला राहिला. वंचित, एमआयएम, बविआ, शेकापचा काही भागांमध्ये जबरदस्त प्रभाव दिसून आला. ठाकरेंचा पराभव हा आताही शिंदेंच्या बंडाशी आणि ठाकरेंच्या भाषेत त्यांच्या गद्दारीशी जोडला जातोय. त्यांच्यावर खापर फोडत आहेत, मात्र शिंदेंनी आपलं काम नेहमीप्रमाणे व्यवस्थित केलेलं आहे, त्यांना जे मिळवायचं ते मिळवलेलं आहे. ठाकरे जास्तकरून मराठी मतं आणि भावनेवर राजकारण करत बसले. मुंबईसह महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त जोर लावायला हवा होता. कारण वेळ सर्वांकडे सारखाच होता, त्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंनी जोरदार आघाडी घेतली, ज्याचा फायदा त्यांना अर्थातच झाला. सत्तेत जरी असले तरी त्यांनी निवडणुकांसाठी केलेली मेहनत नजरंदाज करण्यासाठी नाहीच.

हे ही वाचा :  मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, नगरसेवकांचा पुढील 3 दिवसांचा मुक्काम ठरला!

स्वीकारलेल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास मनसेचे भविष्य उज्ज्वल

25 वर्ष सत्तेत असताना भ्रष्टाचार आरोप आणि प्रचंड अँटी इन्कबन्सी असताना ठाकरेंना फक्त 12 जागा कमी मिळाल्या. तर राज ठाकरेंना 6 जागा मिळाल्या, राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना नक्कीच झालाय मात्र उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून राज ठाकरेंच्या मनसेकडे व्होट ट्रान्स्फर झालं का नाही? असा सवाल आहेच. आता ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर म्हणतात तसे राज ठाकरे यांच्यासाठी ही नवी सुरुवात आहे. खूप झाली धरसोड. आता स्वीकारलेल्या भूमिकेवर ठाम राहून पुढे जायचे ठरवले तर भविष्य उज्ज्वल राहील. यावेळी भले मनसेला कमी जागा मिळाल्या असतील, पण उद्धव ठाकरेंना मिळालेल्या जागांमध्ये त्यांचा वाटा आहेच की! मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रात मनसे आणि राष्ट्रवादी SP पेक्षा ओवैसींच्या AIMIM चा परफॉर्मन्स जोरदार राहिलाय. जास्त चांगला राह्यलाय. युती करून मनसेला फक्त 6 जागा मिळाल्या आहेत तर एकट्याने लढून AIMIM चे 9 उमेदवार मुंबईत निवडून आलेयत. मुस्लिम मतांचा गठ्ठा बांधण्यात 13 शहरांमध्ये ओवैसींना चांगलं यश मिळालं, अर्थात त्यामागे त्यांची मेहनतही आहेच. माध्यमांमध्ये कमी दिसले असले तरी ओवैसी यांनी स्वतः लक्ष घातलेलं सभाही घेतलेल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांची मेहनत कामाला आली.

काँग्रेसची समाधानकारक कामगिरी 

काँग्रेसनंही फार यंत्रणा नसताना आपली ताकद दाखवलीय आणि समाधानकारक कामगिरी केलीय, जी कार्यकर्त्यांचं बळ वाढवणारी नक्की आहे. प्रचारात फार कमी दिसत असतानाही, अपवाद वगळता कार्यकर्ते फार सक्रिय नसताना, स्टार प्रचारक-रोड शो-सभा असं काहीही न करता, मोठा नेता नसताना मुंबईत काँग्रेसचे 24 उमेदवार निवडून आले हे विशेष. शिवाय हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात साडेतीनशेच्या जवळपास नगरसेवक निवडून आणलेत आणि तीन चार ठिकाणी महापौर काँग्रेसचा असण्याची शक्यता आहे. अर्थात काँग्रेसचं हे यश देखील स्थानिक नेतृत्वाच्या मेहनतीचं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp