‘..देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल’, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026 : “आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. ते कधी जमिनीवर राहू शकत नाहीत. गद्दार निघून गेले, पण आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. आता आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे,” असेही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026
Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

‘..देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल’,

point

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026 : मुंबई महापालिकेच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली. निकालानंतर मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका करत कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. “देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल,” असे म्हणत त्यांनी महापौरपदाबाबत आशावाद व्यक्त केला.

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

उद्धव ठाकरे म्हणाले, “या यशाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. जी परिस्थिती होती, ज्या पद्धतीने साम-दाम-दंड-भेदाचा वापर झाला, यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो निकाल लागला आहे तो निश्चितच अभिमानास्पद आहे.” त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजपला कागदावरची शिवसेना संपवता आली असेल, पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपवता येणार नाही.

“आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. ते कधी जमिनीवर राहू शकत नाहीत. गद्दार निघून गेले, पण आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. आता आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे,” असेही ते म्हणाले.

महापौरपदावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपला महापौर व्हायला पाहिजे, हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही नक्की होईल.” तसेच, “गद्दारी करून ज्यांनी विजय मिळवला आहे, त्यांनी हा विजय मुंबई गहाण ठेवण्यासाठी मिळवला आहे. या पापाला मराठी माणूस कधीही क्षमा करणार नाही,” अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp