दत्तक मुलीचा हात न धरल्याने सनी लिओनी ट्रोल, डॅनिअल स्पष्टीकरण देत म्हणाला….
अभिनेत्री सनी लिओनी तिच्या अभिनयामुळे जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळेही. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे. ती विविध प्रकारचे व्हीडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिने दोन मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे तर एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तिने आपल्या कुटुंबीयांसोबत पोस्ट केलेल्या फोटोमुळे ती ट्रोल झाली आहे. काय आहे प्रकरण? […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या अभिनयामुळे जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळेही. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे. ती विविध प्रकारचे व्हीडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिने दोन मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे तर एका मुलीला दत्तक घेतलं आहे. तिने आपल्या कुटुंबीयांसोबत पोस्ट केलेल्या फोटोमुळे ती ट्रोल झाली आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री सनील लिओनी तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी आपल्या तीन मुलांसमवेत एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तिने मुलगी निशाचा हात धरलेला नाही. एवढंच नाही तर जेव्हा सनी लिओनी तिन्ही मुलांसह घराबाहेर पडते तेव्हा दोन मुलांचा हात पकडते मात्र मुलगी निशाचा हात पकडत नाही. सनी लिओनीचे असे काही फोटो पापाराझी फोटोग्राफर्सनी काढले आहेत ज्यामुळे दत्तक मुलीचा हात का धरत नाहीस असं विचारत सनीला ट्रोल करण्यास अनेकांनी सुरूवात केली.