“नीच आणि निर्लज्ज प्रकार!” पक्षचिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवला आहे. याबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत असतानाच आदित्य ठाकरे यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेवर आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला होता. ज्यानंतर ठाकरे विरूद्ध शिंदे हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला होता. निवडणूक आयोगाने यासंदर्भात उशिरा निर्णय देत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही गोठवलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?

खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! या ओळी ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजेच त्यांच्या आजोबांचा फोटोही ट्विट केला आहे.

हे वाचलं का?

२१ जूनला शिवसेनेत सर्वात मोठं बंड

21 जूनला महाराष्ट्रात जे बंड झालं त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतल्या ४०आमदारांचा गट आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्यानंतर उद्धव ठाकरे नव्या जोमाने कामाला लागले. आदित्य ठाकरे यांनीही शिव संवाद यात्रा काढून आपलं म्हणणं मांडत लोकांना भावनिक आव्हान केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटाचा उल्लेख गद्दार असाच केला. मात्र दोन गटातले जे वाद निवडणूक आयोगासमोर गेला होता त्यानंतर हा निर्णय आला. आता आदित्य ठाकरे यांना संताप अनावर झाला आहे हेच त्यांचं ट्विट दर्शवतं आहे.

निवडणूक आयोगाच्या दारात शिंदे विरूद्ध ठाकरे हा वाद गेला होता. शिवसेनेचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दोन्ही गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून म्हणजेच ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं आहे?

“आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही डाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही” मोदी-शहा जी फडणवीसजीतुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू.

ADVERTISEMENT

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय म्हटलं आहे?

आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह! सोबत आहे फक्त ‘ठाकरे’ नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म.. कायदेशीर लढाया सुरूच राहतील.. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT