एग्जिट पोल

मुंबई उपनगर : ‘तुझ्या आईसोबत अनैतिक संबंध आहेत’ म्हणणाऱ्या मित्राला संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवशंकर तिवारी, मुंबई उपनगर

सावत्र आईसोबत संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबई उपनगरात उघडकीस आली आहे. पोलिसांना बोरिवली-कांदिवली रेल्वे मार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर जखमा आढळून आल्यानं पोलिसांनी संशय आला. त्यानंतर पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

मुंबई उपनगरातील बोरिवली आणि कांदिवली दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर पोलिसांना एक मृतदेह आढळला होता. तरुणाच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्यानं ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. दरम्यान, तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय खरा ठरला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मयत तरुण ज्याच्या घरी राहत होता, त्यानेच हत्या केल्याचं समोर आलं. मयत तरुणाचे आपल्या सावत्र आईसोबत संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केलं.

काय आहे घटना?

ADVERTISEMENT

आरोपी मूळचा बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी असून, अशोक मुखिया (वय १९) असं त्याचं नाव आहे. तो सावत्र आईसोबत पोईसरमध्ये राहतो. महिनाभरापूर्वी त्याचा गावातील मित्र गणेश मुखिया (वय २२) त्याच्याकडे आला आणि त्याच्यासोबतच राहत होता.

ADVERTISEMENT

दरम्यान, माझे तुझ्या आईसोबत अनैतिक संबंध आहे, असं अधूनमधून गणेश अशोकला म्हणायचा. हे ऐकून अशोक चिडायचा. दोन दिवसांपूर्वी अशोकने कामाच्या ठिकाणाहून धारदार चाकू आणला. २७ जानेवारी रोजी अशोक गणेशला घेऊन रेल्वे रुळावर आला. त्यानंतर अशोकवर चाकून हल्ला केला. त्यानंतर गणेशने जखमी अशोकला रेल्वे रुळावर फेकून दिलं.

गणेशचा मृत्यू अपघातात झाल्याचा दाखवण्याचा अशोकचा डाव होता. मात्र, त्याचा हा डाव फसला. रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासातून हत्या असल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी अशोकला अटकही केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT