Pune News: नमाज अदा करण्यावरून राडा, मंदिरात नेमकं काय केलं.. पुण्यातील नेमकं प्रकरणं काय?
Pune Controversy Latest News : पुणे येथील पौड गावात काल शुक्रवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. स्थानिक ग्रामपंचायतीने वादग्रस्त प्रस्ताव सादर करून गावा बाहेरील मुस्लीम लोकांना मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यास रोखलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात नमाज अदा करण्यावारून दोन गटात राडा

ग्रामपंचायतीने सादर केला वादग्रस्त प्रस्ताव

पुण्यात नेमकं घडलं तरी काय?
Pune Controversy Latest News : पुणे येथील पौड गावात काल शुक्रवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. स्थानिक ग्रामपंचायतीने वादग्रस्त प्रस्ताव सादर करून गावाबाहेरील मुस्लीम लोकांना मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यास रोखलं होतं. प्रस्ताव पारित होण्याच्या काही वेळानंतर उघडकीस आलं की, मुस्लिम तरुणाने गावातील शिवलिंगची विटंबना केली होती. यामुळे सामाजिक तणाव वाढला होता.
ही खळबळजनक घटना घडल्यानंतर मोठ्या संख्येत लोक ग्रामीण पौड पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले. त्यानंतर जमावाने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. सामाजिक तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानंतर लोकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेरील गर्दी कमी केली. दरम्यान पोलिसांन याप्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा >> 'हा बघा कोयता गँगचा कालचा थरार..' रोहित पवारांनी थेट दाखवला Video, काका अजित पवारांना घेरलं
पुण्यातील धक्कादायक घटनेवर पोलिसांनी दिली मोठी प्रतिक्रिया
तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे. पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसवी यांनी घटनेचा तपास करत म्हटलं, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढील तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामपंचायतीने एक वादग्रस्त प्रस्ताव सादर करून गावाबाहेरील मुस्लीम लोकांना स्थानिक मशिदीत नमाज अदा करण्यास रोखलं. प्रस्ताव सादर केल्याच्या काही वेळानंतर आरोप करण्यात आले की, गावात नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांना रोखलं जाऊ शकतं.