देश अन् राज्यानंतर आता मुंबईवर नजर! मोदींनी फुंकलं BMC निवडणुकांचं रणशिंग
(PM Narendra Modi on BMC Election) मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, आजच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. याच सभेत त्यांनी मुंबई […]
ADVERTISEMENT
(PM Narendra Modi on BMC Election)
ADVERTISEMENT
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, आजच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. याच सभेत त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांचं अधिकृतरित्या रणशिंग फुंकलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, जगभर भारतासंदर्भात सकारात्मक वातावरण आहे. जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था खराब आहे, पण आपल्या देशात पायाभूत सुविधांवर अनेक कामं सुरु आहेत. मुंबईला आपल्याला भविष्यासाठी तयार करायचे आहे, ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे.
हे वाचलं का?
तसंच मुंबईसारख्या शहराला प्रगतीपथावर नेताना स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. केवळ राज्य सरकारकडून वेगानं काम करून जर खाली पैसा योग्य ठिकाणी पोहोचणार नसेल, केवळ बँकात खितपत पडणार असेल तर मुंबईचा विकास कसा होईल? असा सवालही पंतप्रधान मोदी यांनी विचारला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील १० मुद्दे :
-
मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी
ADVERTISEMENT
दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार पाहिजे.
ADVERTISEMENT
आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास विकास अधिक वेगान होईल.
भविष्यात आमचं सरकार मुंबईचा कायापालट करणार
डबल इंजिन सरकार नव्हते तेव्हा कामात अडथळे निर्माण करण्यात आले.
मुंबईच्या विकासासाठी शहरात समर्पित प्रशासन असेल तर विकास वेगानं होतो, एकत्रित मिळून मुंबईचा विकास करु.
शिंदे आणि फडणवीसांची जोडी सत्तेत येताच राज्यात पुन्हा वेगाने काम होऊ लागली आहेत.
डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकालाही आधुनिक सुविधा देण्याचे काम करत आहे.
कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीसांचे अभिनंदन करतो.
मुंबईच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही पण पैसा बँकांमध्ये पडून राहिल्यास विकास कसा होणार?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT