Maharashtra Sadan Scam प्रकरणी माझीही दोषमुक्त सुटका व्हावी, भुजबळांचा कोर्टात अर्ज

विद्या

मुंबई: Maharashtra Sadan scam Case: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan scam) विशेष एसीबी कोर्टाने (Acb court) पाच आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. यावेळी कोर्टाने असंही म्हटलं आहे की, या संपूर्ण तपासातच त्रुटी आहेत आणि यात फक्त सरकारी पक्षाचं समर्थन करणारे कागदपत्रं जोडले गेले आहेत. याच आधारे कोर्टाने पाच आरोपींची निर्दोष सुटका केल्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: Maharashtra Sadan scam Case: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan scam) विशेष एसीबी कोर्टाने (Acb court) पाच आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. यावेळी कोर्टाने असंही म्हटलं आहे की, या संपूर्ण तपासातच त्रुटी आहेत आणि यात फक्त सरकारी पक्षाचं समर्थन करणारे कागदपत्रं जोडले गेले आहेत. याच आधारे कोर्टाने पाच आरोपींची निर्दोष सुटका केल्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील आपली निर्दोष सुटका व्हावी यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी देखील कोर्टात अशाच प्रकारचा अर्ज दाखल केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना तत्कालीन फडणवीस सरकारने तुरुंगात टाकलं होतं.

दरम्यान, आता या प्रकरणी पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याने आपल्यावरील आरोप देखील कोर्टाने रद्द करावेत अशी मागणी भुजबळांच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जात केली गेली आहे.

दरम्यान, न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात पाच जणांची निर्दोष सुटका करताना तपास अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. लाचलुचपत विभागच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अत्यंत घाईघाईने एफआयआर नोंदवून अयोग्य आणि बेकायदेशीरपणे कारवाई केली असल्याचं कोर्टाने आपल्या निकालपत्रात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp