किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून वगळलं, सरपंच युवतीने मालिकेला दाखवला बाहेरचा रस्ता!
सातारा: राजकीय दबावातून स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील यांची भूमिका साकारत असलेले सातारा जिल्ह्यातील अभिनेते किरण माने यांना मालिका निर्मात्यांनी मालिकेतून वगळले याचा निषेध साताऱ्यासह संपूर्ण राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चित्रिकरण सुरू असलेल्या गुळुंब ग्रामपंचायतीने आता या वादात उडी घेतली आहे. वाई तालुक्यातील गुळुंब ग्रामपंचायतीने मालिका चित्रीकरणालाच परवानगीच नाकारली असल्याचं […]
ADVERTISEMENT

सातारा: राजकीय दबावातून स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील यांची भूमिका साकारत असलेले सातारा जिल्ह्यातील अभिनेते किरण माने यांना मालिका निर्मात्यांनी मालिकेतून वगळले याचा निषेध साताऱ्यासह संपूर्ण राज्यात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर चित्रिकरण सुरू असलेल्या गुळुंब ग्रामपंचायतीने आता या वादात उडी घेतली आहे. वाई तालुक्यातील गुळुंब ग्रामपंचायतीने मालिका चित्रीकरणालाच परवानगीच नाकारली असल्याचं पत्र थेट प्रोडक्शन कंपनीला दिले आहे. यावेळी त्यांनी प्रोडक्शन हाऊसला थेट ‘चले जाव’चा नारा दिला आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी या संदर्भात मालिका निर्मात्यांना पत्र दिले असून पॅनोरमा इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड संस्थेला काल (15 जानेवारी) रोजी पत्र देऊन चित्रीकरण थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपट सृष्टीचा व मालिका प्रोडक्शन कंपनीचा जाहीर निषेध या गुळुंब ग्रामपंचायतीने केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणारी स्टार प्रवाह वाहिनी व मुलगी झाली हो या मालिकेच्या प्रोडक्शन व संपूर्ण टीमने महाराष्ट्रात शिवशंभु शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लोकशाही नांदते हे विसरू नये. असा सल्ला देखील दिला आहे.










