Porn Video Case : Raj Kundra नंतर आणखी एका आरोपीला अटक

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत अश्लील व्हिडीओ तयार करुन ते Mobile App वर टाकण्यासंदर्भात पोलिसांनी सोमवारी रात्री मोठी कारवाई करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली. याच प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. रायन जॉन असं या आरोपीचं नाव असून त्याला नवी मुंबईतील नेरुळ भागातून अटक करण्यात आली आहे.

मुंबई क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मालवणी पोलीस ठाण्यात याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या रॅकेटमध्ये राज कुंद्राचा मुख्य सहभाग होता. कुंद्राच्या सहभागाचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या अनेक तरुणींना जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडीओत काम करायला लावणारं एक रॅकेट मुंबईत आहे. अश्लील व्हिडीओ, वेब सिरीजच्या नावाखाली या मुलींकडून अशा पद्धतीची काम करुन घेत त्यांना बॉलिवूडमध्ये मोठं काम देण्याचं अमिष दाखवलं जातं. यासाठी मुंबईतील अनेक बंगले भाड्यावर घेतले जातात असंही पोलिसांनी सांगितलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याआधीही राज कुंद्रा काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकला आहे. याआधी एका प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने राज कुंद्रावर आरोप केला होता की राज कुंद्राने तिच्या फोटोंचा गैरवापर केला आहे. राज कुंद्राने या प्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावले होते तसंच माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही असंही सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं होतं की ज्या कंपनीने अश्लील व्हीडिओ तयार केले होते ती कंपनी मी कधीच सोडली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT