राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही भाजपचं टेन्शन वाढलं! ‘मविआ’चा निर्णय झाला
Kasba peth and chinchwad assembly bypoll : पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कसबा पेठमधून काँग्रेसचा (Congress) रविवारी (५ फेब्रुवारी) संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही निवडणूक बिनविरोध […]
ADVERTISEMENT
Kasba peth and chinchwad assembly bypoll :
ADVERTISEMENT
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कसबा पेठमधून काँग्रेसचा (Congress) रविवारी (५ फेब्रुवारी) संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही निवडणूक बिनविरोध होणार हे डोक्यातून काढून टाका असं म्हटलं आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील कसबा पेठ आणि चिंचवड निवडणूक होणार असल्याचं सांगतं ही लोकांची इच्छा आहे, असं म्हटलं आहे. (After raj thackeray Mahavikas Aaghadi will contest kasba peth and chinchwad assembly bypoll)
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न :
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी फोन केले आहे आणि पत्रही पाठविणार आहोत, असं सांगितलं आहे. ते म्हणाले, याआधी आपण अशी अनेक उदाहरणं बघितली की ज्या व्यक्तीचा मृत झाला त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना विनंती करणार की सात आठ महिन्यासाठी ही निवडणूक लढू नये.
हे वाचलं का?
Dhiraj Lingade : “नाना पटोले म्हणाले, अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर”
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे प्रयत्न :
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या दोन्ही निवडणूका बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे पूर्ण प्रयत्न असणार आहेत. या ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केले आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष चर्चाही करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
Shahrukh Khan : शाहरुख खानला झटका; होऊ शकतो पठाणच्या कमाईवर परिणाम
राज ठाकरेंचं ‘मविआ’ला पत्र :
या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मध्यस्थी केली आहे. राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ज्यात त्यांनी राजकीय संस्कृती, कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं घेतलेल्या भूमिकेचा दाखला देत महाविकास आघाडीच्या नेत्यांना (MVA Leaders) आवाहन केलं आहे.
भाजपकडून उमेदवारी जाहीर, महाविकास आघाडीची प्रतिक्षा :
दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड या मतदारसंघांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने कसबा पेठेतून हेमंत रासने आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीकडून कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेस रविंद्र धंगेकर आणि चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT