‘वेड’ ब्लॉकबस्टर! रितेश-जिनीलिया अनोख्या पद्धतीनं मानणार प्रेक्षकांचे आभार

मुंबई तक

After ved movie Blockbuster Ritesh-Genelia will thank the audience in a unique way मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ‘वेड’ने आता ५० कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा, संवाद, गाणी हे सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मूल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

After ved movie Blockbuster Ritesh-Genelia will thank the audience in a unique way

मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ‘वेड’ने आता ५० कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा, संवाद, गाणी हे सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मूल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं ‘वेड’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. (After ved movie Blockbuster Ritesh-Genelia will thank the audience in a unique way)

त्यानंतर आता लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात समाविष्ट केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर अगदी बॉलीवूड, टॉलीवूडमध्ये देखील हे घडलं नव्हतं. पण ‘वेड’ चित्रपटात आता सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जिनीलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं ‘वेड तुझे..’ या गाण्याचं नवं व्हर्जन सामिल करण्यात येणार आहे. सोबत काही नवे सीन्सही चित्रित करून सामिल करण्यात आले आहेत.

येत्या शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी २०२३ पासून चित्रपटगृहात ‘वेड’ पाहताना आता या नव्या गाण्याचा आनंदही प्रेक्षक लुटू शकणार आहेत. रितेश-जिनीलिया हे जोडपं केवळ ऑन स्क्रीन नाही तर ऑफ स्क्रीनही चाहत्यांचं फेव्हरेट आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना एकत्र पाहणं सगळ्यांना आवडतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp