ज्ञानव्यापीचा निर्णय हिंदू पक्षाकडून; निकालावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, बाबरी मशिदीच्या दिशेने…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्ञानवापी मशीद वादावर जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया आली आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, अशा निर्णयामुळे 1991 च्या वर्शीप कायद्याचा अर्थ नष्ट होतो. ओवेसी म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण बाबरी मशिदीच्या वाटेवर जात आहे आणि त्यामुळे देशात 80-90 च्या दशकात वापस जाईल.जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात दाद मागावी, असेही AIMIM पक्षाचे प्रमुख ओवेसी म्हणाले.

ADVERTISEMENT

मुस्लिम बाजूची याचिका न्यायालयाने फेटाळली

ज्ञानवापी शृंगार गौरीप्रकरणी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. जिजा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने याचिका सुनावणीस हिंदूंची बाजू योग्य असल्याचे मानले आहे. त्याचवेळी न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली. ज्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला होता की ,1991 चा वर्शीप कायदा ज्ञानवापीला लागू होतो. म्हणजेच ज्ञानवापीच्या स्वरूपाशी छेडछाड करता येत नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आहे.

हे वाचलं का?

असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?

ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणावरील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, जो आदेश आला आहे त्यामुळे देशात अनेक गोष्टी सुरू होतील. प्रत्येकजण न्यायालयात जाईल आणि म्हणेल की आम्ही 15 ऑगस्ट 1947 पूर्वी येथे होतो. अशा परिस्थितीत 1991 च्या वर्शीप कायद्याचा उद्देशच फसला आहे.

ADVERTISEMENT

असे वाद कायमचे संपावेत म्हणून वर्शीप कायदा आणल्याचे ओवेसी म्हणाले. मात्र आता न्यायालयाच्या आदेशाने आपण 80-90 च्या दशकात परत जात आहोत असे दिसते. जे योग्य होणार नाही. ज्ञानवापी प्रकरण बाबरी मशिदीच्या दिशेने जात असल्याचेही ओवेसी म्हणाले. ओवेसी पुढे म्हणाले की, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयामुळे अस्थिरता निर्माण होईल. बाबरी मशिदीचा निकाल आला तेव्हाही देशासमोर अडचणी निर्माण होतील, असा इशारा मी दिला होता. कारण श्रद्धेच्या आधारावर निर्णय देण्यात आला होता, असे काही मुद्दे ओवेसींनी ज्ञानव्यापीचा निकाल लागल्यानंतर समोर आणले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT