Ajit Pawar: विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारचे वाभाडे, नागपुरात पवार-फडणवीसांमध्ये जुंपणार

ऋत्विक भालेकर

Ajit Pawar Nagpur: नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ज्यामध्ये त्यांचा विशेष रोख हा भाजपवरच होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. (ajit pawar and devendra fadnavis will clash in nagpur, ajit pawar criticizes the government before the winter […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ajit Pawar Nagpur: नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ज्यामध्ये त्यांचा विशेष रोख हा भाजपवरच होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. (ajit pawar and devendra fadnavis will clash in nagpur, ajit pawar criticizes the government before the winter session)

पाहा पत्रकार परिषदेत अजित पवार काय म्हणाले:

महाराष्ट्रहितासाठी सरकारला रचनात्मक सहकार्य

नागपूरला दरवर्षी होणारे हिवाळी अधिवेशन कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे होऊ शकले नाही. जवळपास तीन वर्षांनंतर नागपूरला हिवाळी अधिवेशन होत आहे. उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्यांसह राज्यासमोरील प्रश्नांवर, विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाला गती देणारे निर्णय अधिवेशनाच्या माध्यमातून व्हावेत, ही राज्यातील तेरा कोटी जनतेची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारला रचनात्मक सहकार्य करण्याची भूमिका विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेहमीच घेतली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp