स्टँपपेपरवर लिहून देतो मुख्यमंत्री येणार! असं म्हणूनही उद्धव ठाकरे का आले नाहीत? अजितदादांनी दिलं उत्तर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले नाही ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. अधिवेशन जेवढं वादळी ठरलं तेवढीच ही चर्चाही. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाला आले नाहीत त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार हे मी काय आता स्टँपपेपरवर लिहून देऊ का? मात्र अधिवेशन संपलं तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दर्शन सभागृहाला झालं नाही. त्यानंतर अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला अजित पवार…आणि भास्कर जाधवांनी मागितली माफी

काय म्हणाले आहेत अजित पवार?

हे वाचलं का?

मुख्यमंत्री अधिवेशनात येतील असं मी स्टँपपेपरवर लिहून देतो असं म्हटलं होतं. मात्र ते आले नाहीत. मी आज माझे शब्द मागे घेतो. यातला गंमतीचा भाग जाऊद्या. मला एवढंच सांगायचं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार होते. मुख्यमंत्री पाचही दिवस आमच्या संपर्कात होते. आमच्या दोन कॅबिनेटमध्ये ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय झालं? त्या सगळ्या मुद्द्यांची माहिती मुख्यमंत्री घेत होते. मात्र आमच्यातले दोन कॅबिनेट मिनिस्टर काही आमदार हे कोरोनाबाधित झाल्यानंतर आम्हीच त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय आज शेवटचा दिवस आहे आणि कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. शेवटी तुमची तब्बेत महत्त्वाची आहे. आत्ताच मुख्यमंत्री एका मोठ्या शस्त्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळेच आम्ही येऊ नका असं त्यांना सांगितलं.

आज यायचं, पत्रकार मित्रांशी बोलायचं, सभागृहात उपस्थित राहायचं हे सगळं आम्हाला म्हणजे अनिल परब, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि मला यासंदर्भातल्या सूचना आल्या होत्या. मात्र आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पाडल्या आहेत तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या. त्यामुळे ते सभागृहात आले नाहीत असं कारण अजित पवार यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

‘बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नाहीतर…’ भास्कर जाधव यांची भाजपवर घणाघाती टीका

ADVERTISEMENT

चार्जवरूनही वाद झाला. विरोधकांनी मागणी केली होती असं विचारलं असता अजितदादा म्हणाले तो सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कुणाकडे द्यायचा, आमच्या सरकारमध्ये काय करायचं ते आम्ही ठरवू ना. विरोधकांनी काहीही सांगूदेत आमच्या सरकारमध्ये बाहेरच्यांनी नाक खुपसायचं काय कारण आहे असा टोलाही अजित पवारांनी जाता जाता चंद्रकांत पाटील यांना लगावला. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री आले नाहीत तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते आजारी आहेत तोपर्यंतचा कार्यभार काही काळ आदित्य ठाकरेंकडे द्यावा. त्यांच्यवरही मुख्यमंत्र्यांच्या विश्वास नाही का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला होता. आज याबाबत अजित पवारांना विचारलं असता बाहेरच्यांचा नाक खुपसायचा काय संबंध? असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता त्यांना उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT