ठाकरे सरकारने पाठवलेली 12 आमदारांची नावं CM शिंदेंकडून मागे; अजित पवार म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदनगर : शिंदे सरकराने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली १२ आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार जुनी नावं मागे घेऊन शिंदे सरकारकडून नवीन नावं पाठवली जाणार आहेत.

ADVERTISEMENT

शिंदे यांच्या या निर्णयाबाबत बोलताना तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ‘आता जनतेने ठरवायचे आहे’, असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या पाठवलेल्या यादीवर राज्यपालांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने आलेल्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून संबंधित नाव दिली होती.

‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’; एकनाथ शिंदेंच्या समोर नारायण राणे काय म्हणाले?

हे वाचलं का?

आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना भेटायला गेलेलो होतो. ते म्हणायचे की मी त्याच्यात बघतोय, माझं चालू आहे. परंतु तेव्हा तर काही झालं नाही. आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती, त्यांना एवढा अधिकार आहे. त्यामुळे आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिपणी करू शकत नाही, आता जनतेने ठरवायचे आहे, असेही पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने केली होती १२ नावांची शिफारस

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी तिन्ही पक्षांतून नावांची शिफारस केली होती. तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारशीला मंजुरीच दिली नाही.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंची ठाकरेंविरुद्ध आणखी एक चाल! १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दल राज्यपालांना पत्र

ADVERTISEMENT

हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेलं होतं. न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांनी किती कालावधीत हा निर्णय घ्यावा, हेही बंधनकारक नसल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं. त्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मंजुरी दिली गेली नाही. यावरून राज्यपालांवर बरीच टीकाही झाली होती.

महाविकास आघाडी सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या नावांपैकी काही नेते आता आमदार झाले आहेत. यात सचिन अहिर, एकनाथ खडसे हे विधान परिषदेवर गेले आहेत. तर रजनी पाटील या राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT