अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आल्यात जमा आहे. कारण कोरोनाचे रूग्ण आणि ओमिक्रॉनचे रूग्ण वाढले आहेत. नेते मंडळीची, आमदारांचीही, विरोधी पक्षातल्या नेत्यांचीही पाठ कोरोना सोडताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मंत्री, आमदार, विरोधी पक्षातले आमदार यांना कोरोना झाला आहे. अजित पवार विधानसभेत कानी कपाळी ओरडून सांगत होते की मास्क लावा. मात्र कुणीही त्यांचं ऐकलं नाही. अखेर कोरोनाने या नेत्यांना गाठलंच अशी स्थिती आहे.

ADVERTISEMENT

‘रोहितच मास्क वापरत नाही, म्हटलं अरे शहाण्या तू आता आमदार आहेस’, अजितदादांनी धरले रोहित पवारांचे कान

महाराष्ट्रातल्या कोणत्या राजकीय व्यक्तींना कोरोना?

हे वाचलं का?

महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला. त्यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरवर दिली होती.

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाने गाठलं. त्यांना कोणतीही लक्षणं नाहीतर मात्र कोरोना झाला आहे ही माहिती त्यांनीच दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांनाही कोरोना झाला आहे

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला त्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनाही काही दिवसांपूर्वी कोरोना झाला ज्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

रोहित पवार यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिरा त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. अजित पवारांनी त्यांना जामखेड येथे झालेल्या भाषणात मास्क न लावण्यावरून झापलं होतं.

पंकजा मुंडे यांनाही पुन्हा एकदा कोरोना झाला आहे याची माहिती त्यांनी दिली.

भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोना झाला आणि त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली होती. ते एका लग्नात सहभागी झाले होते तिथे त्यांनी मास्क लावला नव्हता त्याचप्रमाणे अधिवेशनातही त्यांनी मास्क लावला नव्हता.

इंद्रनील नाईक, चंद्रकांत निंबा पाटील, समीर मेघे, माधुरी मिसाळ या आमदारांनाही कोरोना झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोना झाला तसंच त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोना झाला आहे.

या सगळ्या नेत्यांना कोरोना होण्यामागचं कारण हे मास्क न लावणं हेच आहे. अजित पवार यांनी अधिवेशन सुरू असताना हात जोडून, विनंती करून सांगितलं होतं की मास्क लावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील बोलताना मास्क लावत नाहीत तसंच विरोधी बाकांवरचे आणि सत्ताधारी बाकांवरचेही बहुतांश लोक मास्क लावत नाहीत ही बाब त्यांनी समोर आणली होती. आता या सगळ्यांनाच कोरोनाने गाठलं आहे हेच दिसून येतं आहे.

अधिवेशनात काय म्हणाले होते अजित पवार?

इथे बसलेले अनेक सदस्य लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतात. सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील कोरोनाच्या संकटाबाबत खूप गंभीर आहेत. काही ठराविक जण सोडले तर अजिबात कुणी मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथे काय चाललं आहे ते बघतो आहे. जर आम्हीच कुणी मास्क लावत नसू तर काय होईल? मी तर बोलतानाही मास्क लावलेला असतो. काहींना मास्क लावून बोलता येत नाही. मग किमान बोलून झाल्यावर तरी त्यांनी मास्क लावला पाहिजे ना. पण तसंही होताना दिसत नाही. परदेशात तीन दिवसाला दुप्पट रूग्ण वाढत आहेत. पाच लाख मृत्यू होतील असा अंदाजही वर्तवला जातो आहे. महाराष्ट्रातही हे संकट दिसतं आहे अशावेळी त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण वागलं पाहिजे. उद्या माझ्यासारख्याने जरी मास्क लावला नसेल तर मला बाहेर काढा. विरोधी पक्षनेते तुम्हालाही विनंती आहे. असं बोलत अजित पवार यांनी मास्क न लावणाऱ्या सगळ्यांनाच खडे बोल सुनावले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT