'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण'वर कोणाचा हक्क? सुनावणीत काय होऊ शकतं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले...

मुंबई तक

Ulhas Bapat Interview about Shiv Sena Supreme Court hearing : उल्हास बापट म्हणाले, अँटी डिफेक्शन कायदा केलेला आहे, त्यामध्ये लिहिलंय तुम्ही स्वत:हून पक्ष सोडलात तर तुम्ही अपात्र होता. मतदान आदेशाप्रमाणे केले नाही, तर तुम्ही अपात्र होता. 1/3 बाहेर पडले तर वाचतील, असा याला पूर्वी अपवाद होता. मात्र, वाजपेयींच्या काळात 91 वी घटना दुरुस्ती करुन ते काढून टाकण्यात आलं. नंतर चौथ्या पॅराग्राफमध्ये लिहिलंय की, 2 तृतीअंश लोक बाहेर गेले आणि नंतर एकत्र आले तर ते वाचतील. आणखी एक महत्त्वाचं लिहिलंय यामध्ये ..ते म्हणजे हा निर्णय स्पीकरने घ्यायचा. 

ADVERTISEMENT

Ulhas Bapat Interview about Shiv Sena Supreme Court hearing
Ulhas Bapat Interview about Shiv Sena Supreme Court hearing
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' कोणाचा?

point

सुनावणीत काय होऊ शकतं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत

Ulhas Bapat Interview about Shiv Sena Supreme Court hearing : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हासंदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून, म्हणजेच 21 जानेवारीपासून, अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर या सुनावणीबद्दल घटनातज्ज्ञांची मत काय जाणून घेऊयात.. ? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांना या संपूर्ण केसबद्दल 'मुंबई Tak' ला मुलाखत दिलीये. त्यानी कोणते मुद्द मांडले? सविस्तर जाणून घेऊयात.. 

सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीदरम्यान पक्षांतर बंदी कायदा आणि पक्षचिन्ह याच्यावर चर्चा होईल. मी आज घटनात्मक तरतुदी कायदा क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत आणि राजकीय पक्षांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी बोलत आहे. रोग आणि लक्षणं यामध्ये आपला घोटाळा होतोय. वजन कमी होतंय, हे लक्षण असतं पण आतमध्ये कॅन्सर झाला असेल तर तो रोग आहे, असं उल्हास बापट यांनी स्पष्ट केलं. 

Ulhas Bapat Interview LIVE: शिवसेना कुणाची? Supreme कोर्टात अंतिम सुनावणी | Uddhav Thackeray

पक्षांतर बंदी कायद्यामध्ये पूर्वी कोणती तरतूद होती?

उल्हास बापट म्हणाले, अँटी डिफेक्शन कायदा केलेला आहे, त्यामध्ये लिहिलंय तुम्ही स्वत:हून पक्ष सोडलात तर तुम्ही अपात्र होता. मतदान आदेशाप्रमाणे केले नाही, तर तुम्ही अपात्र होता. 1/3 बाहेर पडले तर वाचतील, असा याला पूर्वी अपवाद होता. मात्र, वाजपेयींच्या काळात 91 वी घटना दुरुस्ती करुन ते काढून टाकण्यात आलं. नंतर चौथ्या पॅराग्राफमध्ये लिहिलंय की, 2 तृतीअंश लोक बाहेर गेले आणि नंतर एकत्र आले तर ते वाचतील. आणखी एक महत्त्वाचं लिहिलंय यामध्ये ..ते म्हणजे हा निर्णय स्पीकरने घ्यायचा. 

सुप्रीम कोर्टाने चुका केल्याचा उल्हास बापट यांचा दावा 

चंद्रचूड साहेबांनी जो निर्णय दिलाय. मी म्हणत होतो, त्याप्रमाणे ते सगलं सांगत आले होते. मला वाटलं वाह किती सुंदर निर्णय लागतोय. शेवटी त्यांनी तीन पळवाटा त्यांनी ठेवल्या. त्यांनी स्पिकरला महत्त्वाचे अधिकार दिले. सेपरेशन ऑफ पॉवर्सनुसार हा अधिकार होता ते ठीक आहे. आम्ही नाही ठरवणार स्पीकरला ठरवू दे, असं कोर्ट म्हणालं. किती वेळात? तर रिजनेबल टाईम असं त्यांनी म्हटलं. याचा कायद्यानुसार अर्थ तीन महिने असतो. राहुल नार्वेकरांनी 6 महिने काहीच केलं नाही. स्पीकरने कसं वागू नये, याची उदाहरणे ते चांगली देत आहेत. नार्वेकर माध्यमांशी बोलत आहेत. इंग्लंडमधील स्पीकर माध्यमांशी बोलत नाही. ते मुख्यमंत्र्‍यांच्या घरी जाऊन त्यांना भेटत आहेत. ते प्रत्यक्ष राजकारणात उमेदवारांचा फॉर्म भरायला जात आहेत. मी सभापतीपदाचे आदर्श सांगतोय, पण ते या प्रमाणे काहीच करत नाहीत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp