23 वर्षांचा तरुण वाळत टाकलेले महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरायचा, नंतर ते घालून त्याचे फोटो काढून...

मुंबई तक

Crime News : महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमल एन.अजी (वय 23) असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा केरळातील हेब्बागोडी परिसरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घराबाहेर सुकवण्यास टाकलेले महिलांचे अंडगार्मेंट्स चोरायचा तरुण

point

मोबाईलफोनमधील अंडरगार्मेंट्स घातल्याचे अनेक फोटो जप्त

Crime News : कर्नाटक राज्यातील बंगळुरुच्या हेब्बोगोडी भागातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमल एन.अजी (वय 23) असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा केरळातील हेब्बागोडी परिसरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : कैसा हराया, विजयी होताच जितेंद्र आव्हाडांना डिवचलं, मुंब्र्यात AIMIM चा आवाज बुलंद करणारी सहर शेख कोण आहे?

घराबाहेर सुकवण्यास टाकलेले महिलांचे अंडगार्मेंट्स चोरायचा तरुण

पोलिसांनी सांगितलं की, अमल प्रामुख्याने हा विद्यानगर परिसरातील घराबाहेर सुकवण्यास टाकलेले महिलांचे अंडगार्मेंट्स संधी मिळताच चोरायचा. प्राथमिक तपासातून समोर आलं की, आरोपी स्वत: चोरीचे कपडे घालायचा आणि नंतर त्यांचे फोटो देखील काढायचा, यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढू लागलं. 

मोबाईलफोनमधील अंडरगार्मेंट्स घातल्याचे अनेक फोटो जप्त

बुधवारी होयसळा पोलिसांच्या पथकाला या प्रकरणाचा संशय आल्याने हालचालींना वेग आल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची पुष्टी केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. तपासादरम्यान, त्याच्या मोबाईलफोनमधील अंडरगार्मेंट्स घातल्याचे अनेक फोटो जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी खोलीचा तपास केला असता, हे प्रकरण समोर आले आणि त्यांनी महिलांचे अंतर्वस्त्र ताब्यात घेतले. 

हे ही वाचा : इकडं अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच डीजीपी निलंबित; तिकडं स्मगलिंग प्रकरणात लेक आधीच तुरुंगात

दरम्यान, पोलिसांनी भारतीय दंड संहिता, 2023 च्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी किती कधीपासून असं कृत्य करत होता, तसेच त्याने आणखी कुठे कुठे असं कृत्य केलं याबाबतची माहिती तपासातून समोर आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp