काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीबाबांसह ‘यांनी’ केल्या उमेदवारी अर्जावर सह्या
काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या शर्यतीत आता मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव आलं आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी अर्ज भरला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे नाव चर्चेत नव्हतं. अशात त्यांनी अर्ज भरल्याने त्यांची एंट्री ही वाईल्ड कार्ड एंट्री मानली जाते आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी मल्लिकार्जुन खरगेंनी अर्ज भरला आहे. गुरूवारी रात्री उशिरा […]
ADVERTISEMENT

काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या शर्यतीत आता मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव आलं आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी अर्ज भरला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे नाव चर्चेत नव्हतं. अशात त्यांनी अर्ज भरल्याने त्यांची एंट्री ही वाईल्ड कार्ड एंट्री मानली जाते आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी मल्लिकार्जुन खरगेंनी अर्ज भरला आहे. गुरूवारी रात्री उशिरा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी हा अर्ज भरला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर लढवू शकतात, सोनिया गांधी म्हणाल्या Its Your Call
काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे मैदानात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी शशी थरू यांनी राजीव गांधी यांच्या स्मृती स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला. तसंच मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. दिग्विजय सिंह यांनी माघार घेतल्यानंतर आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
कट्टर काँग्रेसी आहेत मल्लिकार्जुन खरगे
पुढचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा असला पाहिजे? हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला असता ते म्हणाले की अध्यक्ष कुणीही झालं तरी हरकत नाही, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचे विचार, विश्वास, धोरण आणि भारताविषयीचा दृष्टीकोन या सगळ्याचं प्रतिनिधीत्व होतं. राहुल गांधी यांनी जे सांगितलं त्या उत्तरात मल्लिकार्जुन खरगे हे एकदम फिट बसतात. कारण मल्लिकार्जुन खरगे हे कट्टर काँग्रेसी आहेत. त्यांनी अगदी कार्यकर्ता पदापासून काँग्रेसमधली कारकीर्द सुरू केली आहे. १९६९ मध्ये ते गुलबर्गा सिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.
मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध
मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध आहेत. भारत जोडो यात्रा आज कर्नाटकात पोहचली. आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी ही यात्रा बेल्लारी असणार आहे. तर १९ ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक हे काँग्रेससाठी महत्त्वाचं राज्य मानलं जातं आहे.
LIVE: Press Briefing by Shri @Jairam_Ramesh, Shri @rssurjewala & Shri @PriyankKharge in Gundlupet, Karnataka. #BharatJodoYatra https://t.co/C6IB2kI5vQ
— Congress (@INCIndia) September 30, 2022
मल्लिकार्जुन खरगे हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. आत्तापर्यंत ते ८ वेळा आमदार तर दोनदा लोकसभा खासदार झाले आहेत. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. आपल्या राजकीय आयुष्यात फक्त एकदा त्यांचा पराभव झाला. ती निवडणूक २०१९ मध्ये झाली होती. त्याआधी सलग १० वेळा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. युपीए सरकारमध्ये खरगेंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. कर्नाटक विधानसभेत थे विरोधी पक्षनेतेही होते. त्याशिवाय त्यांनी कर्नाटकमध्ये गृहमंत्रीपद आणि ग्रामीण विकास मंत्री पदही भुषवलं आहे. काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव निश्चित मानलं जातं आहे.
Kharge's set of nomination papers. Supported by all pic.twitter.com/KAUGrYrsB7
— Kartikeya Sharma (@kartikeya_1975) September 30, 2022
मल्लिकार्जुन खरगेंच्या निवडणूक अर्जावर कुणाच्या सह्या?
मल्लिकार्जुन खरगेंच्या निवडणूक उमेदवारी अर्जावर पृथ्वीराज चव्हाण यांची सही आहे. तसंच मनिष तिवारी, संजय कपूर, कमलेश्वर पटेल, विनित पुनिया, धीरज प्रसाद, रघुवीर सिंग, सलमान खुर्शीद, दीपेंदर हुड्डा, प्रमोद तिवारी यांसह महत्त्वाच्या दिग्गजांच्या सह्या आहेत.