कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसला देणार झटका?; आज अमित शाह, जेपी नड्डांना भेटणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं पुढचं पाऊल काय असेल, याची चर्चा सुरू होती. त्यातच आता अमरिंदर सिंग आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शांत असलेले अमरिंदर सिंग आज (२८ सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेlत.

अमरिंदर सिंग दुपारी दुपारी ३:३० वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री दिल्लीत ते दोन्ही नेत्यांची भेट घेणार आहेत. भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं, तरी पंजाब काँग्रेसमध्ये झालेली उलथापालथ आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे.

हे वाचलं का?

सिद्धूने ‘कॅप्टनची’ विकेट काढलीच, कशी आहे लढवय्या अमरिंदर सिंहाची राजकीय कारकीर्द?

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू सोबत चाललेल्या दीर्घ राजकीय संघर्षानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीवरही निशाणा साधला होता.

ADVERTISEMENT

मला अपमानित झाल्यासारखं वाटलं; कॅप्टन अमरिंदर सिंहांनी व्यक्त केली खदखद

ADVERTISEMENT

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनाम्यानंतर भाजपत जाणार का? याबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यावर आपण काँग्रेसमध्ये आहोत, असं ते म्हणाले होते. त्याचबरोबर आल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यातील निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मध्ये बराच कालावधी गेल्यानंतर ते आज भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे.

भाजपकडून निमंत्रण

अंतर्गत कलहामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपकडून पक्ष प्रवेशाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. भाजपचे नेते आणि हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राष्ट्रवादी नेता असल्याचं सांगत भाजपत येण्याचं आवाहन केलं होतं.

“मी काँग्रेसचा अध्यक्ष असतो, तर कॅप्टन अमरिंदर सिंगांना ३० दिवसातच पक्षातून हाकललं असतं”

‘राष्ट्रवादी कॅप्टन अमरिंदर सिंग हे त्यांच्या वाटेतील अडथळा होते. त्यामुळेच त्यांना राजकारणातून डावलण्याचं काम केलं गेलं. पंजाबमध्ये सर्व राष्ट्रवादी शक्तींनी काँग्रेसचे मनसुबे उधळून लावण्यासाठी एकत्र यायला हवं’, असं वीज म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT