36000 फूट उंचीवर कपल झाले रोमँटिक, फ्लाइटमध्ये केला डान्स… Video व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

जेव्हा भारतात लग्नाचा सीझन येतो, तेव्हा प्री-वेडिंग शूटच्या फोटोंपासून ते डान्स परफॉर्मन्सपर्यंतचे व्हिडीओ व्हायरल होतात.

हे वाचलं का?

आपल्या आयुष्यातील हे क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक सर्व काही हौसेने करतात. एका कपलनेही असंच काहीसं केलं आहे.

ADVERTISEMENT

या कपलने 36000 फूट उंचीवरून फ्लाइटमध्ये रोमँटिक गाण्यावर डान्स केला आहे.

ADVERTISEMENT

लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कपलने नातेवाइकांसाठी संपूर्ण विमान बुक केलं होतं. यासोबतच त्यांनी विमानात मान मेरी जान या गाण्यावर डान्स केला.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर जय करमानी नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आता व्हायरल झाला आहे.

डान्स करणाऱ्या जोडप्यांमध्ये वधूचं नाव श्रुतिका आणि वराचे नाव शुभम अग्रवाल आहे.

चार्टर प्लेनमध्ये हे जोडपे नातेवाईकांसमोर नाचताना दिसत आहेत. इतर सर्व त्यांना चिअर करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ पाहून काहींनी चांगल्या कमेंट केल्या तर काहींना हे करणं पटलेलं नाहीये.

एका यूजरने लिहिलं, ‘अशा प्रकारे तुम्ही सुरक्षा मानकांचा आणि प्रोटोकॉलचा अनादर करत आहात. जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तेव्हा सर्व दोष क्रू मेंबर्सवर टाकला जाईल.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT