जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? अमित शाह म्हणतात…
जम्मू काश्मीरच्या पुनर्रचना दुरूस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह सगळ्याच प्रमुख विरोधी पक्षांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. इतकंच नाही तर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा कधी दिला जाईल? या प्रश्नाचंही उत्तर अमित शाह यांनी दिलं. Don't politicise J-K & Ladakh. If you want a political fight, come […]
ADVERTISEMENT
जम्मू काश्मीरच्या पुनर्रचना दुरूस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह सगळ्याच प्रमुख विरोधी पक्षांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. इतकंच नाही तर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा कधी दिला जाईल? या प्रश्नाचंही उत्तर अमित शाह यांनी दिलं.
ADVERTISEMENT
Don't politicise J-K & Ladakh. If you want a political fight, come in the ring & let's compete. Nobody is scared. It's (J-K & Ladakh) a sensitive part of our country. They've been hurt & have doubts. This House's responsibility is to comfort them, not scrape their wounds: HM Shah pic.twitter.com/q3NCvcMNi0
— ANI (@ANI) February 13, 2021
काय म्हणाले अमित शाह?
“एकाच देशात दोन ध्वज, दोन संविधान आणि दोन पंतप्रधान चालणार नाहीत असं वचन 1950 पासून देण्यात आलं होतं. मात्र हे वचन पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार देशात यावं लागलं. एकही गोळी न चालता जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. जे सदस्य आणि सरपंच झाले आहेत ते लवकरच आमदार म्हणूनही निवडले जातील. जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी तीन घराणी राज्यं करत होती, आता मात्र लोकांच्या हाती सत्ता जाईल. सर्वसामान्य जनता तिथली सत्ता सांभाळेल. एवढंच नाही तर योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल” असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
#WATCH Jinhone Art 370 waapis laane ke aadhar par chunav lada tha wo saaf ho gaye saaf…Nobody, not even our rivals can say that there was fraud or unrest during DDC polls. Everyone voted fearlessly. 51% votes were cast in Panchayat elections in J&K: HM Shah in Lok Sabha, today pic.twitter.com/jtw5XrOZGU
— ANI (@ANI) February 13, 2021
“जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 आमच्या सरकारने हटवलं. भाजपचं सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पंचाय निवडणुका होण्यास सुरूवात झाली. त्याआधी तीन घराणी काश्मीरमधलं सरकार चालवत असत. त्यामुळे तेच कलम 370 चं समर्थन करत होते. काश्मिरी तरूणांना देशाच्या नागरी सेवेत येण्याचा अधिकार नाही का? जर जम्मू-काश्मीरमधल्या शाळा जाळण्यात आल्या नसत्या तर काश्मिरी तरूणही IAS किंवा IPS अधिकारी असते. आज मी काश्मिरी जनतेला सांगू इच्छितो की विकासकामांसाठी सरकारकडे पर्यायी जमीन आहे. तुमची जमीन कुणीही घेणार नाही. एवढंच नाही तर योग्य वेळ आल्यानंतर काश्मीरला राज्याचा दर्जाही दिला जाईल.” असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT