Pegasus बाबतच्या आरोपांवर अमित शाह यांचं विरोधकांना खरमरीत उत्तर, म्हणाले

मुंबई तक

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून म्हणजेच आजपासून सुरू झालं आहे. मात्र या अधिवेशनात जो हंगामा विरोधकांनी केला त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारवर Pegasus प्रकरणी जे आरोप लावण्यात आले आहेत ते आरोप म्हणजे देशाचा अपमान करण्याचा आणि देशाची प्रतिमा मलीन कऱण्याचा प्रयत्न आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून म्हणजेच आजपासून सुरू झालं आहे. मात्र या अधिवेशनात जो हंगामा विरोधकांनी केला त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारवर Pegasus प्रकरणी जे आरोप लावण्यात आले आहेत ते आरोप म्हणजे देशाचा अपमान करण्याचा आणि देशाची प्रतिमा मलीन कऱण्याचा प्रयत्न आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर किती कट रचा, षडयंत्र रचा मात्र या देशाची विकासयात्रा थांबणार नाही हे लक्षात असू द्या असं म्हणत त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.

पावसाळी अधिवेशनात जी विधेयकं येतील त्यातून विकासाचे नवे मार्ग देशाला मिळतील अशी मला अपेक्षा आहे असंही अमित शाह यांनी सांगितलं. इस्रायलच्या पेगासस स्पायवेअरकडून 300 जणांचे फोन टॅप केल्याची चर्चा आहे. अशात आता अमित शाह यांनी या आरोपांच्या टायमिंगचा मुद्दा समोर आणला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या बरोबर एक दिवस आधीच कसे हे आरोप सुरू झाले असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला आहे.

अमित शाह पुन्हा एकदा म्हणाले क्रोनोलॉजी समझनी चाहिये..

हे वाचलं का?

    follow whatsapp