तबस्सुम आणि विक्रम गोखले यांच्या आठवणीत भावूक झाले अमिताभ बच्चन; ब्लॉग लिहून ताज्या केल्या आठवणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

या आठवड्यात बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेते विक्रम गोखले आणि तबस्सुम यांचे निधन झाले आहे. गोखले यांचे अनेक अवयव निकामी झालेल्या आजाराशी झुंज देत होते. तर तबस्सुमला हृदयविकाराचा झटका आला होता. दोन्ही कलाकारांच्या जाण्याने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर सर्व स्टार्सनी शोक व्यक्त केला. दरम्यान, आता अमिताभ बच्चन यांनाही विक्रम गोखले आणि तबस्सुम यांची आठवण काढली.

ADVERTISEMENT

अमिताभ यांना आठवले विक्रम-तबस्सुम

तबस्सुम यांनी 19 नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला होता. तर विक्रम गोखले यांचे 26 नोव्हेंबर रोजी निधन झाले. अक्षय कुमार, अनुपम खेर, अनिल कपूर, मनोज बाजपेयी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण करून श्रद्धांजली वाहिली. आता बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लॉगमध्ये या दोन्ही स्टार्सची आठवण काढली आहे. याशिवाय बिग बींनी आणखी काही नातेवाईकांबद्दल सांगितले.

बिग बी यांनी रविवारी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘हे दिवस दुःखाने भरलेले आहेत… मित्र आणि सहकारी… वेगवेगळे कलाकार एकामागून एक आम्हाला सोडून जात आहेत… आम्ही ऐकतो, पाहतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो… तबस्सुम… विक्रम गोखले आणि आमच्या जवळचे आणि ओळखीचे काही प्रिय लोक… ते आमच्या आयुष्यात आले… त्यांची भूमिका बजावली आणि मग स्टेज रिकामा झाला…’

हे वाचलं का?

विक्रम गोखले यांनी जगाचा निरोप घेतला

विक्रम गोखले हे ७७ वर्षांचे होते. त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे कुटुंबीय त्याची काळजी घेत होते. विक्रमच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या, त्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी मीडिया आणि जनतेला अफवा पसरवू नका असे आवाहन केले. विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन यांनी खुदा गवाह (1992) आणि अग्निपथ (1990) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. याशिवाय बच्चन यांनी 2020 मध्ये एबी की सीडी या मराठी चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात विक्रम गोखलेही होते.

अभिनेत्री तबस्सुम नाही राहिल्या

तबस्सुम यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. बैजू बावरा आणि मुघल-ए-आझम या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. त्यांचा टॉक शो फूल खिले हैं गुलशन गुलशन खूप प्रसिद्ध होता. त्यांच्या निधनाची बातमी अभिनेत्रीचा मुलगा होशांग गोविल याने अंत्यसंस्कारानंतर दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT