‘सावध रहा, भाजप कोरोनापेक्षाही भयंकर’; कौतुकानंतर अमोल मिटकरींची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप कोरोनापेक्षाही भयंकर आहे. भाजपचा जिवाणू मेंदूत गेला, तर माणूस मेल्यानंतरही बरा होऊ शकत नाही, असं म्हणत अमोल मिटकरींनी टीका केलीये. त्याचबरोबर अमोल मिटकरींनी भाजपच्या संघटनांचं कौतूकही केलंय. नागपूरमध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ या कार्यक्रमात […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप कोरोनापेक्षाही भयंकर आहे. भाजपचा जिवाणू मेंदूत गेला, तर माणूस मेल्यानंतरही बरा होऊ शकत नाही, असं म्हणत अमोल मिटकरींनी टीका केलीये. त्याचबरोबर अमोल मिटकरींनी भाजपच्या संघटनांचं कौतूकही केलंय.
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘अजित पवारांनी कोरोना असतानाही आमदारांचा विकास निधी 5 कोटी केला. जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटलांनी नळगंगा-वैनगंगा प्रकल्प दिला. नदीजोड प्रकल्पाचं त्यांचं स्वप्न होतं.’
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “या सरकारने आनंदाचा शिधा आणला. कंत्राटदाराला दिलं. किती लोकांना भेटलं. मंत्र्यांना विचारलं, मंत्री म्हणाले, दिवाळी तुळशी विवाहापर्यंत असते. त्यांनी काही केलं नाही, तरीही त्यांचे प्रचारक आहेत. आपण शांत असतो. जनतेपर्यंत आपण पोहोचत नाही.”
हे वाचलं का?
अजित पवारांवर महाविकास आघाडीचे आमदार नाराज? नरमाईच्या भूमिकेवर आक्षेप
भाजपच्या काही गोष्टी शिकण्यासारख्या, अमोल मिटकरींनी केलं कौतुक
“भारतीय जनता पार्टीकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. शिकल्या पाहिजे. त्यांचं कॅडर आहे. त्यांचं संघटन आहे. ते खोटं असलं तरी रेटून बोलतात. आपण कमजोर कुठं पडतो तर आपण आपल्यातच उणीवा काढत राहतो,” असं म्हणत आमदार अमोल मिटकरींनी भाजपचं संघटनाबद्दल कौतुक केलं.
ADVERTISEMENT
अमोल मिटकरींनी मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारची औरंगजेबाशी केली तुलना
“आपला संघर्ष मोठा आहे. जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाविरुद्ध होता. औरंगजेबासारखं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. हे उद्ध्वस्त करावं लागेल. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे मावळे एकत्र आले पाहिजेत आणि ही व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी एकसंघ राहिलं पाहिजे,” असं म्हणत अमोल मिटकरींनी दिल्लीतील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
‘Rahul Shewale ची बायको रडत मातोश्रीवर आलेली’, खैरेंचे गंभीर आरोप
भाजप कोरोनापेक्षाही भयंकर -अमोल मिटकरी
कोरोनाचा पुन्हा जगभरात संसर्ग वाढू लागला आहे. ही बाब सांगताना अमोल मिटकरींनी भाजप कोरोनापेक्षाही भयंकर असून, त्यापासून सावध रहा, असं विधान केलं. “आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. माणूस एकवेळ कोरोनातून दुरुस्त होतो, हे लक्षात घ्या. म्युकरमायकोसिस आला माणसं दुरुस्त झाली. कोरोना आला माणसं दुरुस्त झाली. परत कोरोना येतोय, आपण परत दुरुस्त होऊ. हे विषाणू शरीरात गेले तरी आपण दुरुस्त होऊ शकतो, पण भारतीय जनता पार्टीचा विषाणू जर मेंदूत गेला तर माणूस मेल्यानंतरही दुरुस्त होत नाही. त्यामुळे भाजपपासून सावध रहा,” अमोल मिटकरी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT