अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन पुन्हा येईन”

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२०१९ ची विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच गाजला. या निवडणूक प्रचारात एक वाक्य देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी होतं ते म्हणजे मी पुन्हा येईन. या वाक्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली एकही प्रचारसभा पूर्ण झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांची यथेच्छ खिल्लीही या वाक्यावरून विरोधकांनी उडवली. मात्र आता हे वाक्य पुन्हा आठवण्याचं कारण आहे ते म्हणजे अमृता फडणवीस. अमृता फडणवीस यांनी नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन असं म्हटलं आहे.

अहमदनगरमध्ये काय होता कार्यक्रम ?

अमृता फडणवीस या मंगळवारी अहमदनगर दौऱ्यावर होत्या. जनसेवा फाऊंडेशन लोणी आणि पंचायत समिती राहता यांच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचा शुभारंभ केला गेला. या कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस आल्या होत्या. या कार्यक्रमाला यायला उशीर झाला तेव्हा त्यांनी आपलं मनोगत संपवत असताना आज मी आले आहे पण मी शब्द देते की मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. ‘मेक इन इंडिया’ बनवणं हेही मोदींचं स्वप्न आहे. पण त्यांचं स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा प्रत्येक स्त्री यामध्ये योगदान देईल. आपण सगळे मिळून भारतासाठी हे स्वप्न साकार करू, हे मला ठाऊक आहे. जेव्हा तुमचं कुटुंब सुखी, समाधानी राहील, तेव्हाच हे स्वप्न साकार होईल. भाषणाचा शेवट करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला या कार्यक्रमात पुन्हा यायचं आहे. मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… कारण यावेळी मला फार मजा आली नाही. कारण येथे यायला मला खूप उशीर झाला. बरीच कामं होती. आता मी जातेय पण मी पुन्हा येईन.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमृता फडणवीस यांनी मी पुन्हा येईन हे वाक्य उच्चारल्याने या व्हिडिओची चांगलीच चर्चा होते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य त्यांच्या निवडणूक प्रचारात प्रसिद्ध केलं होतं. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले तेव्हा त्यांची विधानसभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. मात्र जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं त्यावेळी झालेल्या विशेष अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या टीकेला, खिल्लीला उत्तर दिलं.

४ जुलै २०२२ च्या विशेष अधिवेशनात काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मला जेव्हा विरोधात बसावं लागलं तेव्हा माझी खूप लोकांनी टिंगलटवाळी केली. मी पुन्हा येईन ही कविता मी वाचली होती. त्यानंतर मी पुन्हा येईन या वाक्यावरून मला किती सुनावलं गेलं, किती टिंगल केली गेली. मात्र आज मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही एकनाथ शिंदेंना घेऊन आलो. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्ष होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं माझी टिंगल टवाळी ज्यांनी केली, ज्यांनी अपमान केला त्यांचा बदला मी घेणार आहे. तो बदला इतकाच आहे की माझी टिंगल टवाळी ज्यांनी पुन्हा येईन म्हणून केली त्यांना मी माफ केलं. राजकारणात या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात सगळ्यांचा शब्दानेच वचपा काढला होता. त्याचीही आठवण आज या निमित्ताने झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT