Andheri bypolls results : सर्वात कमी मतं कुणाला मिळाली? पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांचं काय झालं?
ऋतुजा लटके अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार झाल्या आहेत. ऋतुजा लटकेंना बिनविरोध विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलं गेलं होतं. भाजपनं निवडणुकीतून माघारही घेतली, मात्र ऋतुजा लटकेंना निवडणुकीला सामोरं जावंच लागलं. कारण सहा जणांनी निवडणुकीच्या मैदानातून माघारच घेतली नव्हती. ऋतुजा लटकेंविरोधात मैदानात असलेल्या सहा उमेदवारांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्या मतदारांना किती मतं मिळाली, तेच जाणून घेऊयात… […]
ADVERTISEMENT

ऋतुजा लटके अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार झाल्या आहेत. ऋतुजा लटकेंना बिनविरोध विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलं गेलं होतं. भाजपनं निवडणुकीतून माघारही घेतली, मात्र ऋतुजा लटकेंना निवडणुकीला सामोरं जावंच लागलं. कारण सहा जणांनी निवडणुकीच्या मैदानातून माघारच घेतली नव्हती. ऋतुजा लटकेंविरोधात मैदानात असलेल्या सहा उमेदवारांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्या मतदारांना किती मतं मिळाली, तेच जाणून घेऊयात…
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यानं ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित मानला जात होता. अंदाजाप्रमाणे ऋतुजा लटके मोठ्या मताधिक्यानं विजयीही झाल्या. या निवडणुकीत ऋतुजा लटकेंविरोधात निवडणुक असलेल्या एकाही उमेदवाराला दोन हजारापर्यंत मतं मिळाली नाही.
ठाकरे गटावर दबाव टाकल्याचा आरोप करणाऱ्या मिलिंद कांबळेंना किती मतं मिळाली?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मिलिंद कांबळे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मिलिंद कांबळे यांनी आपल्यावर ठाकरे गटाने (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. ही निवडणूक रद्द करण्याची मागणीली मिलिंद कांबळेंनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. दरम्यान, निवडणूक रद्द करण्याची मागणी करणाऱ्या अपक्ष आमदार मिलिंद कांबळे यांना ६१४ मतं मिळाली आहेत. सात उमेदवारांमध्ये सर्वात कमी मतं मिलिंद कांबळे यांना मिळाली आहेत.
ऋतुजा लटके यांच्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस! अनिल बोंडेंनी सांगितलं कारण