Aditya Thackeray : “ऋतुजा लटकेंचा विजय हा निष्ठेचा आणि शिवसैनिकांच्या जिद्दीचा!”
Andheri By Poll Result अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. ६६ हजार २४७ मतं मिळवत ऋतुजा लटके विजयी ठरल्या आहेत. ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत होती. तसंच या निवडणुकीच्या आधी शिवसेनेत पडलेली फूट, त्यानंतर झालेले दोन गट, त्या दोन्ही गटांना मिळालेली नावं या सगळ्या गोष्टीही चर्चेत राहिल्या. उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह […]
ADVERTISEMENT
Andheri By Poll Result अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. ६६ हजार २४७ मतं मिळवत ऋतुजा लटके विजयी ठरल्या आहेत. ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत होती. तसंच या निवडणुकीच्या आधी शिवसेनेत पडलेली फूट, त्यानंतर झालेले दोन गट, त्या दोन्ही गटांना मिळालेली नावं या सगळ्या गोष्टीही चर्चेत राहिल्या. उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं. या चिन्हावरच ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी ट्विट करून हा निष्ठेचा विजय असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?
आज अंधेरी पोटनिवडणुकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे! या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे! असं ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी ऋतुजा लटकेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे!
ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे! pic.twitter.com/aOXJ81dtXt— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 6, 2022
हे वाचलं का?
रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं. या निवडणुकीत दिवंगत लटके यांच्या पत्नी आणि ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात अपक्ष उमेदवार रिंगणात होते. राज ठाकरे आणि शरद पवारांच्या विनंतीनंतर भाजपनं या निवडणुकीतून माघार घेतली होती आणि त्यानंतर या निवडणुकीची चर्चा थंडावली मात्र ३ नोव्हेंबरला मतदान झालं त्यावेळी केवळ 31.74 टक्के मतदान झालं. ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित मानला जात असतानाच या निवडणुकीत मतदानाच्या आधी पडद्यामागून ‘नोटा’ ला मत टाका असा जोरदार प्रचार झाल्याची चर्चा आहे.
काय म्हटलं आहे ऋतुजा लटके यांनी?
आज या निवडणुकीत जो विजय झाला तो माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे असं मी मानते. रमेश लटके यांनी हयात असताना जी जनसेवा केली, लोकांची कामं मार्गी लावली त्यामुळेच त्याचंच रूपांतर हे आजच्या विजयात झालं आहे असं मी मानते. मतदारांनी त्याचीच परफेड केली आहे असं मला वाटतं. भाजपने उमेदवारी मागे घेतली पण नोटा निवडा हे सांगण्यात येत होतं. त्याच्या क्लिप्सही आल्या होत्या. मतदारांनी बऱ्याच प्रमाणात नोटावर मतदान केलं आहे. ते का? याचं कारण हे लोकांना, मतदारांनाच विचारलं पाहिजे असं लटके यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT