Andheri bypoll election results : ऋतुजा लटके अंधेरीच्या आमदार, ‘नोटा’ने अपक्षांवर केली मात
रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना ६६, हजारांहून अधिक मतं मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे अंधेरी पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. यात दुसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला मिळाली आहेत. ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर शिवसेना भवनात आणि ठाकरे […]
ADVERTISEMENT

रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना ६६, हजारांहून अधिक मतं मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे अंधेरी पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. यात दुसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला मिळाली आहेत. ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर शिवसेना भवनात आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जल्लोष केला जात आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निकाल : 19वी फेरी
ऋतुजा लटके – 66,247
बाळा नाडार – 1,506
मनोज नाईक – 888