MMRDA लाच प्रकरणात ED च्या हाती आरोपींच्या संभाषणाची टेप
मुंबई तकः टॉप्स ग्रुप सिक्युरिटी प्रकरणी चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) हाती एम ससीधरन आणि अमित चंडोले या दोन आरोपींमधलं रोकॉर्ड झालेलं संभाषण लागलं आहे. या संभाषणात त्या दोघांमध्ये लाच देण्याबद्दल चर्चा सुरू असल्याचं त्यात ऐकू येतंय. या संभाषणात एमएमआरडीएचे सह आयुक्त बी.जी. पवार यांच्या नावाचा उल्लेख आल्याने त्यांना या आठवड्यात चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर […]
ADVERTISEMENT
मुंबई तकः टॉप्स ग्रुप सिक्युरिटी प्रकरणी चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) हाती एम ससीधरन आणि अमित चंडोले या दोन आरोपींमधलं रोकॉर्ड झालेलं संभाषण लागलं आहे. या संभाषणात त्या दोघांमध्ये लाच देण्याबद्दल चर्चा सुरू असल्याचं त्यात ऐकू येतंय. या संभाषणात एमएमआरडीएचे सह आयुक्त बी.जी. पवार यांच्या नावाचा उल्लेख आल्याने त्यांना या आठवड्यात चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर रहायचं आहे.
ADVERTISEMENT
टॉप्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एम ससीधरन आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या निकट असलेले अमित चंडोले हे ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीच्या हाती लागलेल्या रेकॉर्डेड संभाषणामध्ये ते दोघे एमएमआरडीएमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच देण्याबाबत चर्चा करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमएमआरडीएच्या सहआयुक्त बी.जी. पवार यांच्याबद्दल हे दोघेही जण बोलत आहेत. या संभाषणात चंडोले आणि ससीधरन यांच्या संभाषणात एक ठराविक रक्कम ससीधरन आणि चंडोल यांच्याकडून पवार यांना देण्याबाबत उल्लेख आहे.
ही बातमी वाचा: MMRDA चे आयुक्त आर. ए. राजीव यांना ईडीने बजावलं समन्स
हे वाचलं का?
एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्याबरोबर पवार यांनाही ईडीने समन्स बजावला आहे आणि या आठवड्यात त्यांना ईडी समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी पवार यांना या संभाषणात त्यांच्या नावाचा उल्लेखाबद्दल विचारणा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT