MMRDA चे आयुक्त आर. ए. राजीव यांना ईडीने बजावलं समन्स
मुंबई: अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स जारी केलं आहे. आर. ए. राजीव जे MMRDA (मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) चे आयुक्त आहेत त्यांना ईडीने टॉप्स ग्रुप सिक्युरिटी प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. 2014 ते 2017 या तीन वर्षात एमएमआरडीए आणि टॉप्स ग्रुप सिक्युरिटी यांच्यात जे व्यवहार झाले होते त्याचप्रकरणी आता ईडीकडून […]
ADVERTISEMENT

मुंबई: अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स जारी केलं आहे. आर. ए. राजीव जे MMRDA (मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) चे आयुक्त आहेत त्यांना ईडीने टॉप्स ग्रुप सिक्युरिटी प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
2014 ते 2017 या तीन वर्षात एमएमआरडीए आणि टॉप्स ग्रुप सिक्युरिटी यांच्यात जे व्यवहार झाले होते त्याचप्रकरणी आता ईडीकडून ही नोटीस धाडण्यात आली आहे. दरम्यान, 2014 ते 17 या कार्यकाळात उरविंदर सिंह मदान हे एमएमआरडीएचे आयुक्त होते. मात्र, सेवानिवृत्त झाल्याने त्या प्रकरणी एमएमआरडीएच्या वतीने ए. आर. राजीव हे ईडी कार्यालयात जाणार आहेत. जरी हे प्रकरण त्यांच्या अगोदरच्या कार्यकाळाशी संबंधित असलं तरीही याबाबतची जी माहिती उपलब्ध असणार आहे ती ते ईडीला देणार आहे. अशी अधिकृत माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, याच प्रकरणात शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश यांची याआधीच ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. टॉप्स ग्रुपचे प्रमोटर राहुल नंदा हे ब्रिटनमध्ये आहेत. यामुळे अद्याप तरी ईडी त्यांची चौकशी करु शकत नाही. त्यामुळे राजीव यांच्या चौकशीतून प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर छापे टाकले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते आणि सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि टॉप ग्रुपमधील अधिकाऱ्यांमधील कथित आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी केली होती.