Remdesivir चा योग्य वापर कसा करावा जाणून घ्या सोप्या शब्दांमध्ये

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डॉ. राहुल पंडित

कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढतो आहे. रोज वाढणारी रूग्ण संख्या आणि मृत्यू हे दाखवत आहेतच की कोरोनाचा वेग किती वाढला आहे. अशात एका औषधाची चर्चा चांगलीच होते आहे. ते औषध आहे Remdesivir. कोरोनाच्या या महामारीत या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. कोरोनावर काही औषधं प्रभावी ठरत आहेत. काही औषधांची चाचणी आत्ताही सुरू आहे. काही औषधं अशी आहेत ज्यांची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही औषधं सुरक्षित आणि कोरोनावर प्रभावी ठरणारी अशी औषधं आहे. सध्या रेमडेसिवीर हे इंजेक्शन लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलं जातं आहे त्याचा तुटवडाही भासतो आहे.

Covid Emergency: महाराष्टात Oxygen, रेमडेसिवीर, बेड, प्लाझ्मा कोणतीही वैद्यकीय मदत हवी? तर हे फोन नंबर येतील कामी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता आपण जाणून घेऊया की रेमडेसिवीर नक्की कसं काम करतं?

जेव्हा कोरोनाचा व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो, पेशींपर्यंत पोहचतो तेव्हा तो त्याचं मूळ रूप सोडून शरीरात जी एक रचना असते त्याच्याशी स्वतःला जुळवून घेतो. प्रत्येक प्रादुर्भाव, संसर्ग यांच्यावेळी व्हायरस आणि माणसाच्या शरीरात असलेली विविध प्रथिने आणि व्हायरसमध्ये असलेली प्रथिने एकमेकांशी जोडली जातात. या व्हायरल प्रोटीनला RdRp असे संबोधले जाते. हे RdRp व्हायरसच्या इंजिनसारखे काम करते. रेमडेसिवीवर हे इंजेक्शन या RdRp वर म्हणजेच व्हायरसच्या इंजिनवर हल्ला करतं. त्यामुळे रेमडेसिवीर हे महत्त्वाचं मानलं जातं आहे.

ADVERTISEMENT

‘रेमडेसिवीर इंजेक्शन काही ‘संजीवनी’ नाही, त्याने मृत्यूदरही कमी होत नाही, फक्त…’

ADVERTISEMENT

रेमडेसिवीर वापरण्याची योग्य वेळ कोणती?

रेमडेसिवीर हे पहिलं असं औषध आहे जे USFDA ने संमत केलं आहे, ज्याचा उपयोग SARS- CoV2 virus यांच्यावर केला जातो. कोव्हिडचा रूग्ण गंभीर स्थितीत असेल तरीही हे औषध त्याचं योग्य काम करतं असंही दिसून आलं आहे. हे औषध घेतल्यानंतर व्हायरसच्या आपल्या शरीरात तयार होणाऱ्या प्रतिकृती बंद करण्याचं काम हे इंजेक्शन करतं. पहिल्या सात दिवसांमध्ये हे इंजेक्शन घेणं अत्यंत फायद्याचं ठरू शकतं. कोव्हिड झाल्यानंतर 10 दिवस उलटले तर प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे औषध शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत पहिल्या टप्प्यात वापरलं गेलं पाहिजे.

रेमडेसिवीर बाबत आणखी काय माहिती?

WHO ने केलेल्या अभ्यासानुसार रेमडेसिवीर हे औषध कोरोना मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी ठरत नाही. मात्र रेमडेसिवीर घेतल्याने जे रूग्ण रूग्णालयात दाखल असतात त्यांचा रूग्णालयातील कालावधी सरासरी 1 ते 3 दिवस एवढं कमी करण्याचं काम हे इंजेक्शन करतं. ज्या रूग्णांना कोरोनाची लक्षणंही दिसत नाहीत त्यांच्यासाठी या इंजेक्शनचा वापर करण्याची गरज नाही. ज्यांना मध्यम लक्षणं आहेत किंवा सहव्याधी असताना कोरोना झाला तर त्यांनाही हे इंजेक्शन देऊ नये. जसं वर नमूद केलं आहे त्याप्रमाणे कोव्हिड झाल्याच्या दुसऱ्या ते दहाव्या दिवसांपर्यंत पहिल्या टप्प्यात हे इंजेक्शन दिलं गेलं पाहिजे.

रेमडेसिवीर हे इंजेक्शन सरकसकट सगळ्यांना देता येत नाही. मात्र ज्यांना ते देता येतं म्हणजेच सहव्याधी नसलेले रूग्ण किंवा इतर अवयवांचे आजार असलेले रूग्ण वगळून. त्यांच्यामध्ये मात्र या इंजेक्शनचा चांगला परिणाम पाहण्यास मिळाला आहे. सध्याच्या घडीला रेमडेसिवीर या इंजेक्शनची कमतरता भासते आहे. ज्यामुळे या औषधाची आणीबाणी रूग्ण, वैद्यकीय व्यवस्था यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. या औषधाची साठेबाजी अकारण केली जाते आहे. दुसऱ्या लाटेत या औषधाच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे. हे इंजेक्शन लवकर उपलब्ध व्हावं हाच यामागचा उद्देश आहे.

रेमडेसिवीरचा वापर करण्याचा योग्य मार्ग

रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असली तरीही या औषधाचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. कुणालाही या औषधाचा ओव्हर डोस होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. पहिल्या दिवशी 200 MG चा एक डोस आणि त्यानंतर 100 Mg चे डोस पुढचे चार दिवस हा आयडियल कोर्स आहे. तसंच ज्यांना सौम्य, मध्यम लक्षणं आहेत, ज्या लोकांना सहव्याधी किंवा विविध अवयवांचे आजार आहेत त्यांना हे इंजेक्शन देऊ नये. हे औषध कोरोना संसर्गाच्या दहाव्या दिवसानंतर घेण्याचा सल्लाही देण्यात येऊ नये. ज्या लोकांना खरोखर या औषधाची गरज आहे त्यांना ते मिळत नाहीये. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि रेमडेसिवीरचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे.

(डॉ. राहुल पंडित हे फोर्टिस रूग्णालय मुंबई या ठिकाणी क्रिटिकल केअर विभागाचे संचालक आहेत. तसंच ते महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्यही आहेत. )

    follow whatsapp

    ADVERTISEMENT