एप्रिल फुल डे.. मोदींचा फोटो असलेला केक कापून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन

मुंबई तक

विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं महागाई विरोधात एक आगळवेगळं आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून ‘एप्रिल फुल’ केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला निषेधाचा केक कापून अगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं महागाई विरोधात एक आगळवेगळं आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून ‘एप्रिल फुल’ केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला निषेधाचा केक कापून अगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना कमळाचे प्रतिकात्मक फुल देऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

‘कमल का फुल ,एप्रिल फुल’.. ‘मोदी सरकार हाय हाय, एकही भूल, कमल का फुल,’ अशा स्वरुपात घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे.

मागील काही दिवसात देशभरात प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. यामुळेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजप आणि विशेषत: पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन केलं आहे.

हे वाचलं का?