भीमा कोरेगाव: ‘सुरेंद्र गडलिंग यांच्या Computer सोबत छेडछाड, पुरावेही केले प्लांट’, Arsenal चा धक्कादायक रिपोर्ट
पुणे: भीमा-कोरेगाव प्रकरणात (Bhima Koregaon Case) अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक फर्म आर्सेनल कन्सल्टिंगने (Arsenal Consulting) आता आणखी एक मोठा दावा केला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये आपला पहिला आणि दुसरा अहवाल प्रसिद्ध करणार्या कंपनीने आता तिसरा अहवाल जारी केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या कम्प्युटरसोबत छेडछाड केली गेल्याचं आणि पुरावे प्लांट […]
ADVERTISEMENT

पुणे: भीमा-कोरेगाव प्रकरणात (Bhima Koregaon Case) अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक फर्म आर्सेनल कन्सल्टिंगने (Arsenal Consulting) आता आणखी एक मोठा दावा केला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये आपला पहिला आणि दुसरा अहवाल प्रसिद्ध करणार्या कंपनीने आता तिसरा अहवाल जारी केला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या कम्प्युटरसोबत छेडछाड केली गेल्याचं आणि पुरावे प्लांट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अहवाल देण्यात आली आहे.
आर्सेनल कन्सल्टिंगच्या अहवालानुसार, 2018 साली सुरेंद्र गडलिंग यांच्या अटकेच्या दोन वर्षापूर्वी ई-मेलद्वारे त्यांच्या कम्प्युटरसोबत छेडछाड करण्यात आली होती.
या ई-मेलचा रिसीव्हर फक्त सुरेंद्र गडलिंग यांना नव्हे तर स्टॅन स्वामी यांच्यासारखे इतर कार्यकर्तांना देखील पाठविण्यात आले होते. अशावेळी अशीही भीती व्यक्त केली जात आहे की, स्टॅन स्वामी आणि इतर लोकांच्या कम्प्युटरमध्ये छेडछाड करण्यात आली असावी.