जुही चावलाने आर्यन खानसाठी केली प्रार्थना, ‘या’ खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई तक

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा आज वाढदिवस आहे. तुरुंगातून परतल्यापासून आर्यन खान लो प्रोफाईल लाईफस्टाईल प्रेफर करतो आहे. या वर्षी वाढदिवस असल्याने आर्यन आणि त्याच्या कुटुंबाने काहीही प्लान केलेलं नाही. अशात अभिनेत्री जुही चावलाने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. काय म्हटलं आहे जुही चावलाने? आर्यन खानला जुहीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेतच. तसंच आर्यनसोबत जुहीने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा आज वाढदिवस आहे. तुरुंगातून परतल्यापासून आर्यन खान लो प्रोफाईल लाईफस्टाईल प्रेफर करतो आहे. या वर्षी वाढदिवस असल्याने आर्यन आणि त्याच्या कुटुंबाने काहीही प्लान केलेलं नाही. अशात अभिनेत्री जुही चावलाने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हटलं आहे जुही चावलाने?

आर्यन खानला जुहीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेतच. तसंच आर्यनसोबत जुहीने आपल्या मुलांचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो डिस्नेलँडचा असावा असं दिसतं आहे. त्यासोबत एक कॅप्शनलही लिहिलं आहे. या फोटोत सगळी लहान मुलं दिसत आहेत. आर्यन खानच्या नावाने 500 झाडं लावणार आहे असंही जुही चावलाने म्हटलं आहे. देव तुझं सगळ्या संकटांपासून रक्षण करो आणि तुझ्यावर दुःखाची सावलीही पडायला नको अशी प्रार्थनाही जुहीने केली आहे.

आर्यन खानला 2 ऑक्टोबरला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. NCB ने छापा मारून ही कारवाई केली होती. त्यानंतर त्याची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. आर्यन खानला 27 ऑक्टोबरला जामीन मंजूर करण्यात आला. 28 ऑक्टोबरला अभिनेत्री जुही चावलानेच आर्यन खानचा जामीन भरला होता. आज आर्यन खानचा वाढदिवस आहे. या निमित्ताने जुहीने आर्यनला खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगते आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp