समीर वानखेडेंवर कारवाई होणार का? आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यावर मलिकांच्या अकाऊंटवरून सवाल

मुंबई तक

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आर्यन खानला अटक करण्यात आली होती त्या प्रकरणी आता आर्यन खानला क्लिन चीट देण्यात आली आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. समीर वानखेडे यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. तर सना मलिक यांनी हे सगळं प्रकरण फर्जिवाडा असल्याचं म्हटलं आहे. अशात या प्रकरणी नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आर्यन खानला अटक करण्यात आली होती त्या प्रकरणी आता आर्यन खानला क्लिन चीट देण्यात आली आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. समीर वानखेडे यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. तर सना मलिक यांनी हे सगळं प्रकरण फर्जिवाडा असल्याचं म्हटलं आहे. अशात या प्रकरणी नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही ट्विट करण्यात आलं आहे.

आर्यन खानला क्लिन चिट, समीर वानखेडे, सना मलिक काय म्हणाले?

काय आहे ट्विट?

“आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर पाच लोकांना कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणी क्लिन चिट मिळाली आहे. त्यामुळे आता एनसीबीचे समीर वानखेडे, त्यांची टीम तसंच त्यांची प्रायव्हेट आर्मी यांच्याविरोधात कारवाई होणार का? की गुन्हेगारांना पाठिशी घातलं जाणार?” असे प्रश्न नवाब मलिक यांच्या ट्विटर अकाऊंटवरून उपस्थित करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?