आर्यन खान ड्रग्ज केसचा तपास आता संजय सिंग यांच्याकडे, वाचा सविस्तर कोण आहेत संजय सिंग?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खान प्रकरणासह एकूण सहा प्रकरणातले चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे आता आर्यन खान प्रकरण, समीर खान ड्रग्ज प्रकरण यासह एकूण सहा प्रकरणांमधल्या चौकशीत नसणार आहेत कारण दिल्ली एनसीबीने तसे आदेश दिले आहेत. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कारवाई करून आर्यन खानला अटक केली होती. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर खोटी कागदपत्रं सादर करून आरक्षण मिळवल्याचे, धर्म बदललेला लपवल्याचे, निकाह आणि तलाक लपवल्याचे आरोप केले होते. तसंच त्यांच्या उंची राहणीमानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ज्यानंतर समीर वानखेडेंकडून ही प्रकरणं काढून घेण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणाचा तपास हा आता संजय सिंग यांच्याकडे असणार आहे. संजय सिंग हे दिल्लीत एनसीबीच्या मुख्यालयात कार्यरत आहेत. ओदिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. आपण जाणून घेऊ कोण आहेत संजय सिंग?

हे वाचलं का?

संजय सिंग हे 1996 च्या भारतीय पोलीस सेवा (IPS) ओदिशाचे अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत. ओदिशाचे अतिरीक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर त्यांची बदली दिल्ली एनसीबीच्या मुख्यालयात करण्यात आली.

ओदिशात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना ते ड्रग्ज टास्क फोर्सचे प्रमुख होते. त्यावेळी त्यांनी ओदिशातील अंमली पदार्थांचं रॅकेट मोडून काढण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली. अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून अनेक अंमली पदार्थांचे व्यवहार उघडकीस आणले होते. एनसीबीचे उपसंचालक म्हणून संजय सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थ आणि गांजाच्या व्यापाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.

ADVERTISEMENT

क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. आता या सगळ्यानंतर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरण, समीर खान प्रकरण यासह एकूण सहा प्रकरणं काढून घेण्यात आली आहेत. आता संजय सिंग हे या प्रकरणांचा तपास करणार आहेत. या प्रकरणात आणखी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT