प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळे आर्यन खान पार्टीमधे गेला होता’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळेच आर्यन खान त्या क्रूझ पार्टीत गेला होता असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला आणि ऋषभ सचदेवा या तिघांनाही NCB ने ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं. ते का सोडून देण्यात आलं याचं उत्तर NCB ने द्यावं अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

कोण आहेत प्रतिक गाबा, फर्निचरवाला

प्रतिक गाबा हा क्रूझवरील पार्टीचा को-ऑर्डिनेटर होता. त्यानेच आर्यन खानला पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. आर्यनने तशी माहितीच दिललेली आहे. तसेच आमीर फर्निचरवाला यांनीही आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. या दोघांचाही या पार्टीच्या आयोजनात सहभाग असल्याचं सांगितलं जातं.

हे वाचलं का?

प्रतीक गाबा , आमीर फर्निचरवाला यांचा कोर्टात उल्लेख

प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेला होते. 1300 लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री 12 तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी 11 लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं, असा सवाल मलिक यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ऋषभ सचदेवा या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याच्या मेहुण्याला सोडून देण्यात आलं असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे

आणखी काय म्हणाले नवाब मलिक?

ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. एका चॅनलने या तिघांचे व्हीडिओही चालवले होते. या तिघांना कसं सोडून देण्यात आलं त्याचे व्हीडिओही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र सोडून देण्यात आलं. ऋषभ सचदेवाचे वडील, काका तिथे आले होते. त्यांच्यासोबत या तिघांना सोडून देण्यात आलं असा गौप्यस्फोट आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

ऋषभ सचदेवा हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे मेहुणे आहेत. मोहित कंबोज यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर दिग्गजांसोबतही मोहित कंबोज यांचे फोटो आहे. ऋषभ सचदेवाला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर दोन तासांनी सोडून देण्यात आलं. त्यावेळी तिघांना सोडून देण्यात आलं. जे इतर दोघे आहेत प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला या दोघांनी बोलवल्यामुळेच आर्यन खान तिथे गेला होता.1300 लोकांची क्षमता असलेल्या जहाजावर छापा मारला. त्यातल्या 11 लोकांना तुम्ही ताब्यात घेतलं. त्यानंतर या सगळ्यांना NCB च्या कार्यालयात नेण्यात आलं. या तिघांना सोडून देण्यासाठी आदेश कुणी दिले याचं उत्तर NCB ने द्यावी.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT