SRK’s Son: मोठी बातमी: आर्यन खानच्या अडचणीत प्रचंड वाढ, 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यनला NCB कोठडी

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई-गोवा क्रूझवरील ड्रग्स केस प्रकरणी आर्यन खान याच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. कारण मुंबईतील किला कोर्टाने ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या NCB कोठडीत वाढ केली आहे.

ADVERTISEMENT

आर्यनच्या फोनमध्ये काही धक्कादायक फोटो आणि चॅटिंग सापडलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी. अशी मागणी एनसीबीकडून करण्यात आली होती.

दरम्यान, एनसीबीची ही मागणी कोर्टाने देखील ग्राह्य धरली. मात्र, यावेळी कोर्टाने 11 ऑक्टोबरऐवजी 7 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानसह बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांना मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

आर्यन खान यांचा कोणत्याही ड्रग्स सिडिंकेटशी संबंध नव्हता. त्यामुळे त्यांची कस्टडी वाढविण्यात येऊ नये असा युक्तीवाद आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा हा युक्तीवाद ग्राह्य न धरता एनसीबीची कोठडी वाढवून देण्याची मागणी मान्य केली.

NCB कडून करण्यात आली 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी

ADVERTISEMENT

आर्यन खानची कोठडी मागताना एनसीबीने कोर्टात असं म्हटलं होतं की, आर्यनच्या फोनमध्ये काही फोटो आणि चॅट्स सापडले आहेत जे आक्षेपार्ह आणि धक्कादायक आहेत. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी.

ADVERTISEMENT

दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, आर्यनच्या फोनमधून अशा काही लिंक मिळाल्या आहेत की, जे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीकडे इशारा करत आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणी वाढल्या आहेत.

एनसीबीने असंही म्हटलं की, ‘चॅट्समध्ये अनेक कोड नेम सापडले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी आम्हाला कस्टडीची आवश्यकता आहे. लिंक आणि नेक्सस समोर आणण्यासाठी देखील कस्टडीची गरज आहे. कारण यांच्या फोनमधून ड्रग्स तस्करांसोबत व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चॅट्स आढळून आलं आहे. याप्रकरणी छापेमारी देखील सुरु आहे.’

यावेळी एनसीबीकडून कोर्टात असाही युक्तीवाद करण्यात आला की, आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून पैशांचा व्यवहार झाल्याचं देखील समजतं आहे. चॅटमधून असंही समोर आलं आहे की, त्याने बँक ट्रांझेक्शनसाठी कॅशची देखील मागणी केली आहे.

वकील मानेशिंदे यांनी कोर्टात आर्यनची नेमकी बाजू कशी मांडली?

दरम्यान, पूर्वी केलेले चॅट्सच्या आधारावर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तसेच दुसऱ्यांसाठी माझ्या क्लायंटला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याची गरज नाही. यामुळेच जामीन देण्यात यावा अशी आम्ही मागणी करतो.

यावेळी मानेशिंदे यांनी एनसीबीने केलेला ड्रग्स खरेदी-विक्रीचा दावाही खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. ‘खान यांनी ठरवलं तर संपूर्ण क्रूझ ते खरेदी करु शकतात. त्यामुळे त्यांना क्रूझवर ड्रग्स विकण्याची काहीही गरज नाही.’ असं म्हणत त्यांनी एनसीबीच्या कोठडी वाढवून देण्याच्या मागणीला विरोध केला होता.

SRK’s Son: ‘आर्यनच्या फोनमध्ये सापडलेत धक्कादायक फोटो, 11 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी द्या’, NCB ची मागणी

मात्र, या ड्रग्स प्रकरणात मोठ्या ड्रग सिंडिकेटचा सहभाग असल्याने त्याची चौकशी करण्याची गरज आहे. असा युक्तीवाद एनसीबीकडून करण्यात आला आणि ती गोष्ट ग्राह्य धरुन कोर्टाने आर्यनसह तीनही आरोपींची कोठडी वाढवली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT