गंगा किनारी सापडले तब्बल 2 हजार मृतदेह, हादरवून टाकणारा ग्राऊंड रिपोर्ट!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कानपूर: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सध्या अत्यंत भयंकर परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण 27 जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या गंगा नदी (Ganga River) किनारी आता अत्यंत भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. थेट मृतदेह (Dead body) गंगा नदीत फेकून सत्य लपविण्याचा जो प्रकार होत आहे ते सत्य स्वत: गंगा नदीने जगासमोर उघड केलं आहे. कारण गंगा नदीच्या 1140 किनारी भागात आतापर्यंत तब्बल 2 हजाराहून अधिक मृतदेह (2000 Dead Bodies) सापडले आहेत.

ADVERTISEMENT

गंगा नदी ही उत्तर प्रदेशातील तब्बल 27 जिल्ह्यामधून 1140 किलोमीटरचा प्रवास करून बिहारमध्ये प्रवेश करते. त्यापैकी कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलिया येथे सध्या अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

कानपूरमध्ये तर गंगा नदीच्या किनारी आणि पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी उघड्यावरील मृतदेहांवर गिधाडं तुटून पडत आहे. आता स्थानिक प्रशासन या मृतदेहांवर माती टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पावसामुळे पुन्हा मृतदेह हे उघड्यावर येत आहेत.

हे वाचलं का?

CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील कोरोनाची लागण

यामुळे आता प्रशासनाने उत्तर प्रदेशच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी मृतदेह नदीत न फेकता त्यांच्यावर अग्निसंस्कार करावे. यावरुन विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ADVERTISEMENT

‘प्रचंड गरीबी असल्याने लोकांकडे आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे देखील पैसे नाहीत. त्यामुळेच ते मृतेदह गंगा नदीत टाकून देत आहेत.’ अशी टीका बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, अचानक एवढे मृतदेह कसे समोर येत आहेत याबाबत संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. तसेच एवढ्या लोकांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले आहेत याबाबत देखील नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण जे वास्तव समोर येत आहे ते हादरवून टाकणारं आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वात वाईट परिस्थिती

कन्नौजमध्ये सुमारे 350 हून अधिक मृतदेह पुरण्यात आले

कन्नौजमधील महादेवी गंगा घाटाजवळ जवळपास 350 हून अधिक मृतदेह पुरले आहेत. कुणालाही हे मृतदेह दिसू नये म्हणून प्रशासनाकडून त्यांच्यावर माती टाकण्याचं काम सुरु आहे. येथील घाटावर काम करणारे कर्मचारी राजनारायण पांडे यांचे म्हणणे आहे की, पाण्याची पातळी वाढताच गंगेच्या किनारी दफन झालेले मृतदेह पुन्हा पाण्यात तरंगू लागतात. कधीकधी हे मृतदेह इतर जिल्ह्यातही वाहत जातात. गंगेच्या किनारी वसलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.

कानपूरमध्ये 400 मृतदेह सापडले!

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील शेरेश्वर घाटाजवळ तर अर्ध्या तासाच्या आता शेकडो मृतदेह पुरण्यात आले आहेत. त्यामुळे इथे परिस्थिती खूपच भयानक आहे. इथे आपण जिथे-जिथे पाहाल तिथे-तिथे फक्त मृतदेह जमिनीत पुरलेला दिसतील. याबाबत माहिती मिळताच पोलिसांची टीमही इथे पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी प्रत्येक मृतदेहावर माती टाकण्याचे काम सुरू केले.

पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्यं ‘कोरोना संवेदनशील’, महाराष्ट्रानं केलं जाहीर

उन्नावमध्ये दोन ठिकाणी नदी किनारी 900 हून अधिक मृतदेह पुरले

कोरोना काळात देशातील सर्वात मोठी स्मशानभूमी उन्नावच बनलं आहे. येथील शुक्लागंज घाट आणि बक्सर घाटाजवळ तब्बल 900 हून अधिक मृतदेह पुरण्यात आले आहेत. येथे जागोजगी मानवी शरीराचे अवशेष विखुरलेले दिसतात. या मृतदेहांवर आता गिधाडं तुटून पडत असल्याचं दिसून येत आहे. जेव्हा स्थानिक प्रशासनाला याबाबतची माहिती समजली तेव्हा त्यांनी तात्काळ मुतदेहांवर वाळू टाकून त्यांना पुरण्याचा प्रयत्न केला आहे. (As many as 2000 bodies found on the shore of Ganga shocking ground report)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT